‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अभिनेता अमित भानुशाली घराघरांत लोकप्रिय झाला आहे. यामध्ये त्याने अर्जुन सुभेदार हे पात्र साकारलं आहे. मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेमुळे अमितचा चाहता वर्ग गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या अमितने शेअर केलेल्या अशाच एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘ठरलं तर मग’मधील अर्जुन सुभेदार नेहमीच गाडी किंवा रिक्षातून प्रवास करत असल्याचं आपण मालिकेत पाहिलं आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात अमित खूपच वेगळा आहे. सध्या त्याच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे. आलिशान गाडी किंवा रिक्षाने प्रवास न करता अमितने थेट मुंबईने लोकलने प्रवास करत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Nana Patole, Devendra Fadnavis swearing-in ceremony,
फडणवीसांच्या शपथविधीला गेलो नाही कारण…; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले
Asangaon-Kasara local trips, local trains running late,
आसनगाव-कसारा लोकल फेऱ्यांमध्ये एक्सप्रेसचा अडथळा, लोकल गाड्या उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी
BJPs advertisement shows swearing in ceremony as BJPs not mahayutis
चर्चा तर होणारच! जाहिरातीच्या माध्यमातून भाजपचे मित्र पक्षावर दबावतंत्र…

हेही वाचा : “आम्ही दोघंही महाराष्ट्राच्या जनतेचे…”, अशोक सराफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान; पत्नी निवेदिता यांनी शेअर केला खास व्हिडीओ

मुंबईच्या भर गर्दीत प्रवास करूनही अमित उत्साही होता. “५ ते ७ ट्रेन सोडल्यावर मला आता गाडीत चढायला मिळालं” असं कॅप्शन अभिनेत्याने यातील एका फोटोला दिलं आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये थोडीफार गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर त्याने “अखेर आता मी मोकळा श्वास घेऊ शकतो” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “महिलांनी एग्ज फ्रीज करावेत”, राम चरणच्या पत्नीने मातृत्वाबद्दल मांडलं मत; उपासना म्हणाली, “स्त्रियांना प्रसूती काळात…”

amit bhanushali
अमित भानुशाली

अमित भानुशालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्याने छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिक साकारल्या आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अमितला घराघरांत पुन्हा एकदा एक नवीन ओळख मिळाली. अभिनेत्याला सर्वत्र अर्जुन सुभेदार या मालिकेतील नावाने ओळखू लागले आहेत. दरम्यान, रेल्वेने प्रवास केल्याने अभिनेत्याचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Story img Loader