‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली घराघरांत लोकप्रिय झाला आहे. गेल्या वर्षभरात त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अमित या मालिकेत अर्जुन सुभेदार हे पात्र साकारत आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर अभिनेता मूळ गुजराती कुटुंबातील असून त्याची पत्नी श्रद्धा ही मराठी कुटुंबातील आहे. नुकतीच या दोघांनी जोडीने लोकमत फिल्मीच्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी या जोडप्याने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक खुलासे केले.

अमित भानुशाली आणि त्याच्या पत्नीची पहिली नजरानजर डोंबिवली स्थानकावर झाली. पुढे, श्रद्धाने त्याला फेसबुकवर मेसेज केला. यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला, पुढे भेट झाली अन् अमितने थेट श्रद्धाला लग्नाची मागणी घातली. अमित इंडस्ट्रीत काम करत असल्याने सुरुवातीला या दोघांच्या लव्हस्टोरीला घरातून काहीसा विरोध झाला पण, त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने अमित-श्रद्धाच्या सुखी संसाराला सुरुवात झाली.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा : सासूबाई मृणाल कुलकर्णी, तर शिवानी रांगोळेच्या आईला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केले खास फोटो

श्रद्धा म्हणाली, “अमित गुजराती आणि मी मराठी असल्याने कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून आम्ही आर्य समाज पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आम्ही जवळच्या कुटुंबीयांना छोटीशी पार्टी दिली. दोन्ही संस्कृती वेगळ्या असल्याने माझ्या मनात सासरी जाताना सुरुवातीला खूप धाकधूक होती पण, हळुहळू गोष्टी व्यवस्थित झाल्या. यांच्याकडे कांदा-लसूण अजिबात खात नाही आणि माझ्याकडे सगळं खातात. त्यामुळे सुरुवातीला मला याच सगळ्या गोष्टीची जास्त भीती होती.”

हेही वाचा : 12th Fail : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने घेतली IPS मनोज शर्मांची भेट, फोटो आला समोर…

“अमितच्या घरी पहिल्या दिवशी गेल्यावर मला याच्या आईने फक्त एकच गोष्ट सांगितली, ‘हे तुझं घर आहे तुला जे करायचं ते तू कर, तुला हवं ते तू खात जा. तुला किचनमध्ये काम नसेल करायचं तर तसंही चालेल…आमची काहीच हरकत नाही.’ त्या पहिल्या दिवसापासून माझ्या कायम पाठिशी होत्या. मला सुरुवातीला त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या. पंधरा दिवसात त्यांनी मला एवढं नीट सांभाळून घेतलं की, त्या दिवसापासून आतापर्यंत मला माहेरी जावं असं कधीच वाटलं नाही.” असं श्रद्धाने सांगितलं.

हेही वाचा : “ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”

अमित यावर म्हणाला, “या दोघींमध्ये खूप सुंदर बॉण्डिंग झालं आहे. त्यामुळे आता माझी आई मला म्हणते. ‘तू माझा मुलगा नाही. ही माझी मुलगी आहे. तू जा बाहेर…’ पण, मला हिच्या माहेरी खूप चांगली ट्रिटमेंट मिळते. माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात.”

Story img Loader