Tharala Tar Mag Fame Actors : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. टीआरपीच्या शर्यतीत सलग दोन वर्षे आघाडीवर असल्याने या मालिकेची लोकप्रियता सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. सेटवर घडणाऱ्या गमतीजमती हे सगळे कलाकार सोशल मीडियावर शेअर करत असतात. या मालिकेत कुसुम ( सायलीची मैत्रीण ) ही व्यक्तिरेखा अभिनेत्री दिशा दानडे साकारत आहे. तर, अर्जुनच्या जवळच्या मित्राची म्हणजेच चैतन्यची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेशपांडे साकारतोय. या दोघांचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठरलं तर मग’ मालिकेत चैतन्य आणि कुसुम नेहमीच अडचणीत अर्जुन-सायलीला मदत करताना दिसतात. मालिकेत ( Tharala Tar Mag ) या दोघांचं ( चैतन्य आणि कुसुम ) कामापुरतं बॉण्डिंग दाखवण्यात आलं आहे. पण, प्रत्यक्षात मात्र गोष्टी खूपच वेगळ्या आहेत. चैतन्य आणि कुसुम म्हणजेच खऱ्या आयुष्यात दिशा आणि चैतन्य एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नुकताच या दोघांनी एका तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

चैतन्य अन् कुसुमचा जबरदस्त डान्स

आता चैतन्य आणि दिशा यांनी कोणत्या गाण्यावर डान्स केलाय हे थोडक्यात जाणून घेऊयात. जुलै महिन्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता धनुषने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘रायान’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केलेली आहे. विशेषत: या चित्रपटातलं ‘वॉटर पॅकेट’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान हिट ठरलं. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन ए आर रेहमान यांनी केलं असून, याच लोकप्रिय गाण्यावर ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेतील दिशा आणि चैतन्य थिरकले आहेत.

चैतन्य आणि दिशा यांची जबरदस्त केमिस्ट्री या व्हिडीओत सर्वांचं लक्ष वेधून घेते. अभिनेता या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहितो, “आभासी जगात चैतन्य आणि कुसुम… आम्ही विचार केला चला डान्स करुन बघूयात. मग आम्ही रिहर्सल केली, म्हटलं फारतर काय होईल… शेवटी सराव करून आम्ही असे नाचलोय.”

हेही वाचा : आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

नेटकऱ्यांनी या दोघांच्या ( Tharala Tar Mag ) व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “खूप छान”, “कुसुमताई एकदम फॉर्ममध्ये”, “किती गोड”, “अप्रतिम कुसुमताई चैतन्य सर”, “आरारा खतरनाक”, “मस्त”, “भारीच की एकदम कडक डान्स केलाय” अशा प्रतिक्रिया दोघांच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. एकंदर या दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचं चाहत्यांनी देखील कौतुक केलं आहे.