Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : आपल्या सहज सुंदर अभिनयाने गेली अनेक वर्षे जुई गडकरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतून जुई प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत आहे.

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेतील सायली सुगरण असते…प्रतिमाची लेक असल्याने तिला स्वयंपाक करायला आवडतो. सायलीला जेवणातली प्रत्येक गोष्ट येत असते. सुभेदारांची ‘आदर्श सून’ म्हणून सायलीला ओळखलं जातं. ऑनस्क्रीन सायली या पात्राप्रमाणे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी खऱ्या आयुष्यात सुद्धा सुगरण आहे. नुकताच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला. याला तिने खास कॅप्शन दिलं आहे. जुई नेमकं काय म्हणतेय जाणून घेऊयात…

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : “तुम्ही किती घाण स्वभावाच्या…”, वर्षा – निक्कीमध्ये पुन्हा जोरदार भांडण; नेटकरी म्हणाले, “नॉमिनेट झाली फडफड…”

जुई गडकरीने बनवले सुंदर मोदक

जुई गडकरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हातानेच सुंदर अशा कळ्या करून उकडीचे मोदक बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. उकडीचे मोदक बनवण्याची नेमकी पद्धत कशी असते, आधी उकड काढलेलं तांदळाचं पीठ मळायचं पुढे, या पीठाच्या पात्या करून त्यात सारण कसं भरायचं. यानंतर या मोदकांच्या कळ्या कशा करायच्या हे सर्व जुई या व्हिडीओमध्ये दाखवत आहे. खरंतर अभिनेत्रीने हे मोदक मालिकेच्या ( Tharala Tar Mag ) शूटिंगसाठी खास बनवले होते.

Tharala Tar Mag Fame Jui Gadkari
Tharala Tar Mag Fame Jui Gadkari

जुई याबद्दल सांगते, “मालिकेतील पाककृतींच्या सीन्ससाठी अनेकवेळा मला सेटवर स्वयंपाक करावा लागतो. आज मोदक बनवले. आपल्या सेटवर कामासाठी म्हणजेच प्रत्यक्ष सीनसाठी मोदक बनवायला कोणाला आवडणार नाही? यासाठीच मी हे खास हे मोदक बनवले होते.” याशिवाय जुईने तिच्या चाहत्यांना “तुम्ही आज किती मोदक खाल्लेत?” अशा प्रश्न देखील विचारला आहे.

हेही वाचा : ऑनलाइन ओळख अन् आंतरधर्मीय लग्न, बादशाहने पहिल्यांदाच सांगितलं घटस्फोटाचं कारण; ७ वर्षांच्या मुलीबद्दल म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?

दरम्यान, नेटकऱ्यांनी जुईचं भरभरून कौतुक केलं आहे. “सर्वगुण संपन्न आहेस”, “तू कशी एवढी परफेक्ट आहे गं… Reel लाईफमध्ये आणि Real लाईफमध्ये पण… सर्वगुणसंपन्न म्हणतात ना ती तूच… Only One जुई गडकरी…”, “खूप छान मोदक बनवले ताई तू” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी जुईच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader