‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरीने घराघरांत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत तिने सायली ही मुख्य भूमिका साकारली आहे. मध्यंतरी काही वर्षे आजारपणामुळे जुईने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. परंतु, २०२२ मध्ये अभिनेत्रीने ‘ठरलं तर मग’मधून दमदार पुनरागमन केलं. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

शूटिंगमधून वेळ काढत जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यामध्ये अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. एक नेटकऱ्याने “अर्जुनची खरी सायली तर आम्ही बघितली पण जुईच्या खऱ्या आयुष्यातील अर्जुन कोण आहे?” असा प्रश्न तिला विचारला.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

हेही वाचा : “द काश्मीर फाईल्सने लाखोंचे डोळे उघडले, द दिल्ली फाईल्स अनेकांची झोप उडवणार”, कोण म्हणतंय असं? वाचा…

नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत जुई म्हणाली, “कळेल कळेल हा लवकरच कळेल! तसंही मी लग्न कधी करणार? असे असंख्य प्रश्न मला विचारण्यात आले आहेत. काही बायका तर माझ्या लग्नासाठी फारच उत्साही आहेत. नवऱ्याचा फोटो दाखवायला लाजतेस का? असे असंख्य मेसेज मला येतात. पण, अहो लग्न तर होऊद्या! लग्न झाल्यावर रोज नवऱ्याचे फोटो टाकेन मग बोलू नका किती फोटो टाकते ही नवऱ्याचे” या उत्तरापुढे अभिनेत्रीने हसायचे इमोजी जोडले आहेत.

jui
जुई गडकरी

हेही वाचा : “कॅन्सर होण्याची शक्यता…”, ऐश्वर्या नारकरांचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहतीने दिला सल्ला; अभिनेत्री म्हणाल्या, “यापुढे…”

जुईला आणखी एका नेटकऱ्याने, “तुझा सहकलाकार अमित भानुशालीचं लग्न झालं नसतं, तर तुला त्याच्याशी लग्न करायला आवडलं असतं का?” असा प्रश्न विचारला. यावर “हा काय प्रश्न आहे?” असं लिहून जुईने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, अभिनेत्रीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला नुकतंच १ वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षभरापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मालिकेच्या यशाचं संपूर्ण श्रेय जुई नेहमीच मालिकेच्या संपूर्ण टीमसह प्रेक्षकांना देत असते.

Story img Loader