अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये जुई ‘सायली’ ही भूमिका साकारत आहे. मध्यंतरी आजारपणामुळे अभिनेत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. परंतु, ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे तिने अभिनय क्षेत्रात दमदार पुनरागमन केलं आहे. मालिकेमध्ये मंगळागौरीचं शूटिंग सुरु असताना जुई आणि तिचा सहकलाकार अमित भानुशालीने मीडियाशी संवाद साधला. यावेळी जुई गडकरीने तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाच्या तारखेबद्दल खुलासा केला.

हेही वाचा : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप? अभिनेत्रीने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार

जुई गडकरी साकारत असलेल्या ‘सायली’ या पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सायलीच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अलीकडेच ‘हंच मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जुईने खऱ्या आयुष्यात लग्न केव्हा करणार? याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : खिळवून ठेवणारा सस्पेन्स व मर्डर मिस्ट्री; करीना कपूर, जयदीप अहलावत व विजय वर्मा यांच्या ‘जाने जान’चा ट्रेलर प्रदर्शित

जुई आणि तिचा सहकलाकार अमित भानुशाली हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असल्याने अमितला तिच्या लग्नाची तारीख काय असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने २४ फेब्रुवारी २०२४ असं उत्तर दिलं. पण, अमितने सांगितलेली तारीख दुरुस्त करत जुई म्हणाली, अमित थोडासा चुकलाय कारण, लग्नाची तारीख ४ आहे… महिना फेब्रुवारीचं असेल. यंदा माझा व्हॅलेंटाईन डे जरा चांगला साजरा होणार आहे.

हेही वाचा : Video : ऋतुजा बागवेने नव्या घरात केली खास सजावट, भिंतीवर साकारलेल्या विठ्ठलाच्या नावाने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

“मी माझ्या जोडीदाराला सगळ्यात मौल्यवान गोष्ट गिफ्ट म्हणून देणार आहे…माझा वेळ आणि माझं संपूर्ण आयुष्य. असं जुईने सांगितलं. मात्र, अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याचं नाव सांगितलेलं नाही. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या दिवसापासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.