चित्रपट, मालिकांत दिसणारे अनेक कलाकार हे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सोशल मीडियामुळे चाहत्यांनादेखील कलाकारांविषयी अनेक बाबी माहित होतात. चाहते त्यांना आवडणाऱ्या कलाकारांना पाठिंबा देतात. आता अभिनेत्री जुई गडकरी((Jui Gadkari) सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे तिने एक भूपाळी गायली आहे. अभिनेत्रीने तिच्या गोड आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री जुई गडकरी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग'(Tharala Tar Mag) या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे. सायली ही भूमिका जुईने साकारली असून अमित भानुशालीने ठरलं तर मग मालिकेत अर्जुन ही भूमिका साकारली आहे. आता सोशल मीडियावर जुई गडकरीचा एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

जुई गडकरीने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती भूपाळी गाताना दिसत आहे. जुईने ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’, ही भूपाळी गायली आहे. प्रवाह पिक्चर प्रिमिअरवर ३० मार्चला ‘अमर भूपाळी’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या निमित्ताने जुईने ही भूपाळी गायली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने स्टार प्रवाह व प्रवाह पिक्चर या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. आता जुईच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

एक नेटकरी म्हणाला, “ऐकायला खूप गोड वाटत आहे. खूप छान”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “ही खरी नायिका.कारण आम्ही तुम्हाला एक आदर्श सून,बायको,वहिनी ,मैत्रीण अशा नात्यात पाहतो आणि तुम्हीही ते अप्रतिम काम करून सिद्धही केल आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “आता सकाळ झाल्यासारखं वाटतंय”, “व्यग्र जीवनात आपला छंद जोपासणे ही खूप मोठी कला आहे.”

अनेक नेटकऱ्यांनी जुईच्या आवाजाचे कौतुक केले आहे. “आवाजामध्ये खूपच गोडवा आहे असा सतत रियाज करत राहा. सर्व गुण संपन्न अशी जुई”, “खूप गोड आवाज आहे”, “खूप गोड भुपाळी, अगदी तुझ्यासारखी.खूप सुखद व शांत वाटले”, “अप्रतिम सुंदर”, असे म्हणत चाहत्यांनी जुई गडकरीचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती चाहत्यांबरोबर संवाद साधताना दिसते. तसेच मालिकेतूनही जुई प्रेक्षकांची मने जिंकताना दिसते. ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असून नेहमी टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल असलेली दिसते.