छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेची लोकप्रियता गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे. सध्या मालिकेत सायलीची मंगळागौर सुरु असून लवकरच प्रेक्षकांना दहीहंडी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. दहीहंडी विशेष भागात अर्जुनच्या जोडीने सायली सुद्धा दहीहंडी फोडणार आहे. या विशेष भागाचं चित्रीकरण नेमकं कसं झालं? याची खास झलक अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा : “आजारपण, एकटेपणा अन्…”, बायको मितालीच्या ‘त्या’ व्हिडीओवर सिद्धार्थ चांदेकरची कमेंट; म्हणाला…
‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई गडकरीने ‘सायली’, तर अमित भानुशालीने ‘अर्जुन’ची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री हा पडद्यामागचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमच्या मालिकेत दहीहंडी सीक्वेन्सचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. हे शूटिंग आम्ही वन टेक पूर्ण केलं. मला सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे खूप खूप आभार!”
मालिकेतील आगामी भागांविषयी सांगताना अमित भानुशाली म्हणाला, “अर्जुनला सध्या कळतं नाहीये की, सायली त्याला आवडतेय की नाही? परंतु, सायलीबद्दल त्याच्या मनात एका सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे. दहीहंडीमध्ये तुम्हाला अर्जुन-सायलीचं एक वेगळं नातं पाहायला मिळेल. प्रामुख्याने सायलीचं एक नवं आणि धाडसी रुप पाहायला मिळेल कारण, ती अर्जुनसह दहीहंडी फोडताना तुम्हाला दिसेल. बाकी गोष्टी तुम्हाला येत्या भागांमध्ये पाहायला मिळतील.”
हेही वाचा : “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे”; आशा भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त सावनी रविंद्रची खास पोस्ट
दरम्यान, जुई गडकरीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “मी या एपिसोडसाठी प्रचंड उत्सुक आहे.” अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या एका युजरने “एकदम कमाल जुई” असं म्हणत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.