‘ठरलं तर मग’ या मालिकेत लवकरच प्रेक्षकांना मंगळागौर विशेष भाग पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री जुई गडकरी यामध्ये ‘सायली’ हे पात्र साकारत आहे. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाची कथा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना सायलीची मंगळागौर पाहायला मिळणार आहे. मंगळागौरीच्या या खास भागातील पडद्यामागचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : पहिल्या केळवणात अमृता देशमुख-प्रसाद जवादेने घेतले सुंदर उखाणे; ८७ वर्षांच्या आजोबांनी केलं लाडक्या नातीचं केळवण

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने नुकताच नवा प्रोमो प्रसिद्ध केला आहे. मंगळागौरीच्या भागात प्रियाने सायलीला त्रास देण्यासाठी कट रचल्याचं या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दोघीही मंगळागौरीत पारंपरिक होडी हा खेळ खेळत असताना सायलीला दुखापत करण्याचा प्रियाचा हेतू असतो. परंतु, तेवढ्यात सायलीच्या पायावर जन्मखूण असल्याचं तिच्या लक्षात येतं. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सर्वच प्रेक्षकांना माहिती आहे. पण, मालिकेत सुभेदारांच्या घरात कोणालाच याची कल्पना नाही.

हेही वाचा : अभिज्ञा भावेच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

आगामी भागात प्रिया सायलीला दुखापत करण्याचा प्रयत्न करणार की नाही? सायलीच्या पायावरची जन्मखूण नेमकी कोणाला दिसणार? सायलीचा पाय घसरल्यावर तिला कोण सावरणार? या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

मंगळागौरीच्या भागाचा सेटवरचा पडद्यामागचा व्हिडीओ अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत जुई गडकरी लिहिते, “संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण, या सगळ्यांमुळे आम्ही कोणतंही दडपण न घेता उत्तम काम करू शकलो.” नेटकऱ्यांनी आगामी भाग पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “शासनाने तुमची दखल घेतली नाही”, शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्त केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट; म्हणाले…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेला पहिल्या दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame jui gadkari shared bts video of mangalagaur and know about upcoming twist sva 00