अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत जुई गडकरीने ‘सायली’ हे प्रमुख पात्र साकारले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय असते. तिने तिच्या आजीच्या आठवणीत अलीकडेच एक खास पदार्थ बनवला होता. याचा व्हिडीओ जुईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “अक्षया मला आईसारखी ओरडते”, हार्दिक जोशीने केला बायकोबद्दल खुलासा म्हणाला, “किचनमध्ये लुडबूड…”

जुई गडकरीने तिच्या आजीच्या आठवणीत चिवडा तयार केला होता. चिवडा बनवतानाचा संपूर्ण व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत जुई लिहिते, “आजीची आठवण आली की, तिच्या हातचे पदार्थ आठवतात. कर्जतला जेव्हा पहिला पाऊस पडायचा तेव्हा आजी आम्हा भावंडांना असा गरमा गरम instant चिवडा बनवून द्यायची! तिच्या हाताची चव याला नक्कीच नाही पण परवा खूप पाऊस झाला. तेव्हा मला तिची खूप आठवण येत होती. म्हणून हा चिवडा मी बनवला. तुम्ही पण नक्की ट्राय करा!”

हेही वाचा : Video : “संजनाने दहीहंडी फोडली पण…”, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “खूप सुंदर जुई ताई”, “आम्ही सुद्धा असाच चिवडा बनवतो” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.दरम्यान, जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे.