ओटीटी माध्यमांच्या लोकप्रियतेत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. चित्रपट, नाटक, वेब सीरिज यांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत असला तरीही टेलिव्हिजन मालिकांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. सध्या स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठी या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका टीआरपीच्या शर्यतीत एकहाती वर्चस्व मिळवत अव्वल स्थानी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ने यंदाच्या आठवड्यात सुद्धा टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. जुई गडकरीने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’, तर अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारलं आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट लग्न, अस्मिता-प्रियाचे नवनवीन डाव, मालिकेत येणारी रंजक वळणं, प्रतिमाची लक्ष्मीपूजन सोहळ्याला झालेली एन्ट्री यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

हेही वाचा : BB 17 : ‘बिग बॉस’च्या घरात येणार सेलिब्रिटींचा लाडका ओरी! पहिल्याच दिवशी सलमान खानने केली ‘अशी’ थट्टा, व्हिडीओ व्हायरल

गेल्या आठवड्याचा टीआरपी जुई आणि मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रिया तेंडोलकरने शेअर केला आहे. या यादीत पहिल्या टॉप १० मध्ये सगळ्या स्टार प्रवाहच्या मालिका व कार्यक्रमांना स्थान मिळालेलं आहे. पहिल्या स्थानी ‘ठरलं तर मग’, दुसऱ्या क्रमांकावर ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ मालिका तिसऱ्या स्थानी, तर चौथं व पाचवं स्थान अनुक्रमे ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांनी पटकावलं आहे.

पुढे सहाव्या स्थानी या मालिकेत ‘ठिपक्यांची रांगोळी’, सातव्या स्थानी ‘कुण्या राजाची गं तू राणी’, आठव्या स्थानी सिद्धार्थ जाधवचा कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’, नवव्या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’चा महाएपिसोड आणि दहावं स्थान ‘शुभ विवाह’ या मालिकेने मिळवलं आहे.

हेही वाचा : Video : IFFI च्या रेड कार्पेटवर सिद्धार्थ जाधवचा जलवा! दिग्गजांबरोबर झाला अभिनेत्याचा सन्मान; नेटकरी म्हणाले, “अंगावर शहारे…”

जुई गडकरी

विशेष म्हणजे, मागील आठवड्याच्या टीआरपीच्या यादीत पहिल्या १३ स्थानांवर स्टार प्रवाहच्या मालिका आहेत. यानंतर थेट १४ व्या स्थानी ‘झी मराठी’ची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने स्थान मिळवलं आहे. दरम्यान, टीआरपीच्या यादीत गेल्या काही महिन्यांपासून सतत बाजमी मारणारी ‘ठरलं तर मग’ मालिकेला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. यामध्ये जुई गडकरी, प्रिया तेंडोलकर, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, शिल्पा नवलकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame jui gadkari shared trp list of last week know in details sva 00
Show comments