जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई प्रसिद्धीझोतात आली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत जुईने सायली हे पात्र साकारलं आहे. जुई गडकरीसह अभिनेता अमित भानुशाली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली असून, गेले अनेक महिने टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ मालिका आघाडीवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रणबीर कपूरला ईडीकडून समन्स, अभिनेत्याची होणार चौकशी, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

स्टार प्रवाह वाहिनीवर सप्टेंबर महिन्याच्या ४ तारखेला तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही आघाडीच्या मालिकांमध्ये टीआरपीची शर्यत सुरू आहे. याबाबत जुई गडकरीला अलीकडेच एका मुलाखतीत ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका एका आठवड्यात अव्वल स्थानी गेली याबद्दल तिचं मत विचारण्यात आलं. यावर जुई म्हणाली, “नाही…मुळात ही चुकीची गोष्ट आणि चुकीची बातमी आहे. कारण, आमच्याकडे जे मुख्य रेटिंग्ज येतात त्यात ठरलं तर मग ही मालिकाचं नंबर १ ला आहे.”

हेही वाचा : “वाट आता वेगळी आहे, निरोप देताना…”; शिवानी रांगोळेने सादर केली कविता, ऐकल्यावर तुमच्याही आठवणींनी होतील ताज्या

“आम्हाला हे आकडे चॅनेलकडून दिले जातात. अनेकवेळा योग्य TRP रेटिंग्ज नसल्याने चुकीच्या बातम्या समोर येतात. यात त्यांचा दोष नाही… अशा गोष्टी होत राहतात. पण, मी एक गोष्ट जरूर सांगेन, मालिका सुरू झाल्यापासून आजपर्यंत आम्ही पहिलं स्थान टिकवून आहे. ही देवाची कृपा आहे. याशिवाय हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे.” असं जुईने सांगितलं.

हेही वाचा : “ट्रोलिंग, स्टारकिड्स अन्…”, ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वाला ‘या’ दिवशी होणार सुरूवात, पाहा टीझर…

दरम्यान, “मालिकेत आगामी भागात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळतील. येत्या काही भागात सायली कशी शुद्धीवर येणार? तिला पुढे काय होणार? या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील.” असंही जुईने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame jui gadkari talks about fake news of trp ratings sva 00