‘ठरलं तर मग’ ही छोट्या पडद्यावरील मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रक्ट लग्नाच्या कथेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सायली, अर्जुन, प्रिया, कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता अशा या मालिकेतील सगळ्याच पात्रांना घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीचं पात्र ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं आहे. या दिग्गज अभिनेत्रीविषयी थोडक्यात जाणून घेऊया…
हेही वाचा : “मराठी संस्कृतीचं…”, मिताली मयेकरच्या बिकिनीतील बोल्ड फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले…
अभिनेत्री ज्योती चांदेकर अर्थात प्रेक्षकांच्या लाडक्या पूर्णा आजी आणि मराठमोठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यात खास नात आहे. ज्योती चांदेकर यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. गेली अनेक वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. तेजस्विनीला एक मोठी बहिणदेखील आहे.
हेही वाचा : ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘शेवंता’लाही मिळालेला नकार, ऑडिशनचा किस्सा सांगत म्हणाली “त्यांनी मला…”
ज्योती चांदेकर सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या त्यांच्या मुलींसह अनेक फोटो शेअर करतात. ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत ज्योती चांदेकर साकारत असलेल्या पूर्णा आजीच्या पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत सायलीवर अनेकदा पूर्णा आजी रागवत असते परंतु, तेवढ्याच प्रेमाने ती सर्वांची काळजी घेताना दाखवण्यात आलं आहे. सायलीवर हल्ला झाल्यामुळे पूर्णा आजीचे तिच्याबद्दलचे गैरसमज दूर होणार का? हे आगामी भागांमध्ये स्पष्ट होणार आहे.