‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका सुरू झाली. या मालिकेमध्ये रेश्मा शिंद आणि सुमीत पुसावळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता लवकरच या मालिकेत प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सारंगचा हळदी सोहळा पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी खास सायली उपस्थित राहणार आहे.

‘ठरलं तर मग’मधील सुभेदारांची सून सायली ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ सेटवरचा व्हिडीओ शेअर करत सायलीने “ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदी सोहळ्याला नक्की यायचं हं..!” असं कॅप्शन दिलं आहे.

Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
increase in Rabi crop sowing country farming farmers
देशातील रब्बी पेरण्यांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या, पेरा किती हेक्टरने वाढला, गव्हाचे क्षेत्र किती
सोन्याच्या दरात चारच तासात बदल… अर्थसंकल्पांतर पुन्हा…
Sand Policy, Sand , Sand Auction, Scarcity ,
नागपूर : फसलेल्या वाळू धोरणाचे चटके, परराज्यातील वाळूचा पर्याय
Pune Accident
Pune Accident : सासवड रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत मोटार चालकाचा मृत्यू
जगणं आकलनाच्या दिशेनं…
Mohan Hirabai Hiralal passed away recently in Nagpur
एका चळवळीची अखेर!

हेही वाचा : अधिपतीची शिकवणी घेणार नव्या मास्तरीणबाई! मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला

सध्या रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला. मात्र सौमित्रने अवंतिकासोबतच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं. यामुळे संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रबरोबर लग्न करायचं आहे. त्यासाठी तिने सारंगशी लग्न करण्याचं ठरवत नवा डाव आखलाय. परंतु, सौमित्रला किडनॅप करुन ऐन मांडवात सारंगऐवजी सौमित्रबरोबरच लग्न करण्याचा तिचा डाव आहे. ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेल.

हेही वाचा : ‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से

ऐश्वर्याचं लग्न कोणाबरोबर होणार याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झाली आहे. हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ‘ठरलं तर मग’ मालिकेतली सायली येणार आहे. मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत.

Story img Loader