मराठी मालिकाविश्वातील सध्याची आघाडीची मालिका म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’. अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर टिकून आहे. जुई व अमितची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. शिवाय मालिकेतील इतर कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस केल्यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिकेचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशाली आता नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आता नवीन भूमिका म्हणजे मालिकेत अमित दिसणार नाही, असं काही नाही. अमित ‘स्टार प्रवाह’च्याच लोकप्रिय कार्यक्रम ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’मध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – ‘पारू’चा खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे तरी कोण? लग्नाच्या फोटोवरून होतेय चर्चा
‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ कार्यक्रमात अभिनेत्री समृद्धी केळकर ही सूत्रसंचालन करताना दिसते. पण यंदा तिच्याबरोबर ‘स्टार प्रवाह’ परिवारातील अभिनेते देखील प्रत्येक भागात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’च्या येत्या भागात समृद्धीला साथ देताना अमित भानुशाली दिसणार आहे. म्हणजेच अमित सूचसंचालन करताना पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये, अमित ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ सेटवर दिसत असून तो संपूर्ण सेटवर फिरताना पाहायला मिळत आहे. शिवाय समृद्धी केळकर आणि ‘अप्सरा’ चित्रपटाच्या टीमशी अमित संवाद साधताना दिसत आहे.
हेही वाचा – Video: “खूपच भारी दिसतायत…”, अविनाश नारकरांच्या डान्स नव्हे तर नव्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष, म्हणाले…
येत्या शनिवार-रविवार ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ कार्यक्रमात महाराष्ट्राचा लाडका अर्जुन असणारा आहे. रात्री ९.०० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होतो. त्यामुळे लाडक्या अर्जुनला वेगळ्या अंदाजात पाहण्यासाठी ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ नक्की पाहा.