Tharala Tar Mag Maha Episode : मधुभाऊंची सुटका झाल्यामुळे अर्जुन-सायली खूप आनंदात आहेत. सुभेदारांच्या घरात मधुभाऊंचं सायलीने खास स्वागत केलं. सायली त्यांना फराळ खायला देते. यावेळी मधुभाऊ सायलीचं खूप कौतुक करतात. तेव्हा अर्जुन देखील सायलीचं कौतुक करतो. सायलीचे गुणधर्म प्रत्येक फराळात कसे आहेत, याबद्दल सांगतो. त्यानंतर मधुभाऊ निरोप घेत असतानाच पूर्णा आजी येते.

पूर्णा आजी आल्यामुळे अस्मिताला खूप आनंद होतो. तिला वाटतं पूर्णा आजी मधुभाऊंचा अपमान करेल. पण तसं काही होतं नाही. पूर्णा आजी पूर्णपणे पलटते. मधुभाऊंना अपमानास्पद न बोलताना त्यांना चक्क अजून चार दिवस राहण्याची विनंती करते. त्यामुळे आता मधुभाऊ आणि विमलताई सुभेदारांच्या घरी राहणार आहेत. अशातच प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?

हेही वाचा – “लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…

‘ठरलं तर मग’ मालिकेचा येत्या रविवारी १७ नोव्हेंबरला महाएपिसोड असणार आहे. या महाएपिसोडमध्ये अर्जुन आपल्या मनातलं सायलीविषयीचं प्रेम व्यक्त करणार आहे. हेच पाहून प्रियाला आश्चर्याचा धक्का बसला असून आता ती पुन्हा एकदा अर्जुन-सायलीला वेगळं करण्यासाठी नवा डाव रचणार आहे.

नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अर्जुन हातात फुलांचा गुच्छ घेऊन सायली समोर प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रॅक्टिस करत असतो. याचवेळी प्रिया एका झाडामागे लपून हे सर्वकाही ऐकताना दिसत आहे. अर्जुन म्हणतो की, मिसेस सायली मला तुम्हाला माझ्या मनातलं पहिल्यांदाच सांगायचं आहे. तेव्हा प्रियाला मनातल्या मनात म्हणते, “मला माहितीये तुझं सायलीवर खरं प्रेम नाहीये.” पण, तितक्यात अर्जुन म्हणतो, “आय लव्ह यू मिसेस सायली.”

हेही वाचा – Bigg Boss 18मध्ये इन्फ्लुएन्सर, इकडे गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर केली ब्रेकअपची घोषणा, सात महिन्यात संपलं नातं

हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनचं सरकते. प्रिया मनातल्या मनात म्हणते, “म्हणजे अर्जुनचं सायलीवर खरं प्रेम आहे. अर्जुन तुझं हेच खरं प्रेम मी तुझ्या खोट्या कॉन्ट्रॅक्टसारखं खोटं ठरवेन.” त्यामुळे आता येत्या महाएपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

हेही वाचा – Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा महाएपिसोड रविवारी १७ नोव्हेंबरला असणार आहे. दुपारी १ आणि रात्री ८ वाजता हा महाएपिसोड पाहता येणार आहे.

Story img Loader