‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीचं नातं बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेत नुकत्याच पार पडलेल्या होळीच्या उत्सवात सायलीने प्रियाला चांगलीच अद्दल शिकवल्याचं पाहायला मिळालं. भर कार्यक्रमात सायलीने रौद्ररुप धारण केल्याने अर्जुन सुद्धा बायकोवर इम्प्रेस होतो शिवाय सासूबाई कल्पनाला देखील तिचं कौतुक वाटतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे सायली-अर्जुनचं नातं दिवसेंदिवस बहरत असताना दुसरीकडे नागराज आणि प्रिया मिळून सुभेदारांविरोधात कट रचत असतात. तसेच साक्षी शिखरेने सुद्धा गैरसमजाचं जाळं निर्माण करून अर्जुनचा जिवलग मित्र असलेल्या चैतन्यला त्याच्याविरोधात भडकवलेलं असतं. या सगळ्याचा शोध घेऊन अर्जुनला लवकरात लवकर मधुभाऊंना आश्रमाच्या केसमधून निर्दोष मुक्त करायचं असतं. यासाठी आता अर्जुन-सायली मिळून एक नवीन योजना बनवणार आहेत. मालिकेच्या या विशेष भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्रात पुन्हा नंबर १! टीआरपीत मारली बाजी, सायली-अर्जुनने शेअर केली खास पोस्ट

अर्जुन-सायली प्रियाला निनावी फोन करतात. पुढे, अर्जुन काहीशा वेगळ्या आवाजात तिला सांगतो, “ज्या दिवशी खून झाला त्यादिवशी मी तिथेच होतो त्यामुळे तुम्हाला जर पुरावे हस्तगत करायचे असतील, तर मला भेटायला यावं लागेल.” एवढं बोलून तो फोन ठेवून देतो. अशाप्रकारचा निनावी फोन आल्याने प्रियाला धक्का बसतो. पुरावे घ्यायचे असतील, तर ठरलेल्या जागी मला जावं लागेल असा विचार ती करते आणि अर्जुनने सांगितलेल्या स्थळी पोहोचते.

हेही वाचा : Video : “मी असा मजबूर का…”, ओंकार भोजनेने सादर केली मालवणी नाटकातील कविता, प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट

प्रियाला जाळ्यात ओढून तिच्याकडून खरं वदवून घेण्यासाठी अर्जुनचा माणूस आधीच ठरलेल्या जागी थांबलेला असतो. या सगळ्या गोष्टी अर्जुन-सायली झाडामागे लपून गुपचूप पाहत असतात. आता प्रिया अर्जुन-सायलीच्या जाळ्यात अडकणार? की, पुन्हा एकदा हुशारीने सगळ्या प्रकरणातून काढता पाय घेणार हे पुढील काही भागांमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान, मालिकेचा हा विशेष भाग येत्या रविवारी म्हणजेच ७ एप्रिलला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.