‘ठरलं तर मग’ मालिका २०२२ च्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बघता बघता सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा घराघरांत लोकप्रिय झाली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे गेली कित्येक महिने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली, पूर्णा आजी, कल्पना-प्रताप, साक्षी व महिपत शिखरे, चैतन्य, प्रिया, रविराज किल्लेदार, नागराज अशी सगळं पात्र आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. मालिकेत पुढचा ट्विस्ट काय येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.

सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा, मालिकेतील दिग्गज कलाकार यामुळे मालिकेने टीआरपीच्या शर्यतीमधील आपलं पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या टेलिव्हिजन टीआरपी रिपोर्ट्सनुसार ‘ठरलं तर मग’ ही मालिका पुन्हा एकदा महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली आहे.

हेही वाचा : Video : “मी असा मजबूर का…”, ओंकार भोजनेने सादर केली मालवणी नाटकातील कविता, प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट

‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी व अर्जुनच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता अमित भानुशालीने यासंदर्भात पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अमित-जुईने शेअर केलेल्या पोस्टरवर “८.९ TVR सह ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका” झाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावर जुईने ‘ग्रेटफूल’ असं कॅप्शन दिलं आहे.

अमित भानुशाली इन्स्टा स्टोरी

हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”

जुई गडकरी इन्स्टा स्टोरी

टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याने यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात सुद्धा जुईच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला. स्टार प्रवाहची लोकप्रिय महामालिका या पुरस्कारावर ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने काही दिवसांपूर्वीच आपलं नाव कोरलं. याशिवाय आता नुकतेच समोर आलेले टीआरपी रिपोर्ट्स आणि जुईने शेअर केलेल्या पोस्टरनुसार ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरल्याचं समोर आलं आहे. एकंदर चाहते सध्या या मालिकेच्या संपूर्ण स्टारकास्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag marathi serial again topped in trp reports jui gadkari aka sayali shares post sva 00
Show comments