छोट्या पडद्यावर ‘ठरलं तर मग’ आणि ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या दोन्ही मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत पहिलं स्थान राखण्यासाठी सध्या जोरदार चुरस रंगली आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीमध्ये सातत्याने अव्वल क्रमांकावर आहे. हे स्थान टिकवण्यासाठी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आता मालिकेत नवनवीन रंजक वळणं पाहायला मिळणार आहेत. नुकताच ‘ठरलं तर मग’चा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भागात अर्जुनने खूनाच्या केसप्रकरणी साक्षी शिखरेची कसून चौकशी केल्याचं पाहायला मिळालं.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. अर्जुनने साक्षी शिखरेला कोर्टात खोटं सिद्ध केल्याने रविराज किल्लेदार प्रचंड अस्वस्थ होतात. तसेच अर्जुनने सिद्ध केलेल्या गोष्टी खऱ्या असतील, तर यापुढे केस लढताना विचार करेन असंही ते नागराज आणि प्रियाला सांगतात. दुसरीकडे, अर्जुनचा सहकारी असलेल्या चैतन्यबरोबर प्रेमाचं नाटक करुनही त्याने साक्षीला कोणताही पुरावा न दिल्याने महिमत लेकीवर भयंकर संतापतो. घडल्या प्रकारानंतर चैतन्य सुद्धा अस्वस्थ होऊन थेट साक्षीला भेटायला येतो.

suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
Ashok Saraf
“नशीब काढलंय मी…”, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकलाकाराची खास पोस्ट; म्हणाली…
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट
Milind Gawali
मिलिंद गवळींची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाले, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”

हेही वाचा : मराठी अप्सरेचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण! मल्याळम सुपरस्टारसह शेअर करणार स्क्रीन, पाहा पहिली झलक

सीसीटीव्हीच्या पुराव्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही म्हणून साक्षी शिखरे चिडणार याची कल्पना चैतन्यला असते. त्यामुळे तो आधीच तिची माफी मागतो. परंतु, साक्षी सगळ्या गोष्टी मनात ठेवून चैतन्यसह अर्जुनला लवकरच धडा शिकवण्याचा निश्चय करते. केवळ पुढची माहिती मिळवण्यासाठी ती चैतन्यशी खोटा आर्विभाव दाखवून गोड बोलू लागते. त्यामुळे आता अर्जुन-सायलीवर साक्षीचा पुढचा पलटवार काय असणार हे मालिकेत पाहणं आतुरतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कार अन् घरातील महागड्या वस्तू विकल्या; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “अक्षय कुमार व अमिताभ बच्चन…”

दुसरीकडे सुभेदारांच्या घरात साक्षी शिखरे कोर्टात खोटी ठरल्याने आनंदाचं वातावरण असतं. अशातच अर्जुनचा वाढदिवस असल्याने सुभेदारांकडे विशेष तयारी सुरू असते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे सायलीला अर्जुनच्या वाढदिवसाबद्दल काहीच कल्पना नसते. त्यामुळे घरच्यांसमोर तोंडावर पडण्याआधी मिसेस सायलीला वाढदिवसाचं सांगितलं पाहिजे असा विचार अर्जुन करतो आणि घरभर बायकोला शोधू लागतो. अर्जुन सायलीला शोधायच्या आधी कल्पना सायलीला वाढदिवसाबद्दल सांगते. सायली सुद्धा हुशारीने मनातल्या गोष्टी कल्पनासमोर दाखवत नाही. अर्जुन बायकोला शोधत बाहेर येतो आणि गार्डन परिसरात दोघेही एकमेकांना धडकतात. अशातच सायलीला घराजवळ कोणीतरी असल्याचा भास होतो. एकंदर अर्जुनच्या वाढदिवसामुळे सुभेदारांच्या घरात आणि सायली-अर्जुनच्या नात्यात नवा गोंधळ निर्माण झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “अमिताभ बच्चन साहेबांनी मला मिठी मारली अन्…”, उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “तो चित्रपट…”

दरम्यान, अर्जुनच्या वाढदिवसाला सायली काय सरप्राईज देणार? सायली-अर्जुनला चैतन्य आणि साक्षी शिखरेच्या नात्याबद्दल समजेल का? या गोष्टी प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader