‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत ‘सायली’ हे पात्र साकारत आहे. मालिकेत सुरु असणाऱ्या सध्याच्या भागांमध्ये विसर्जन मिरवणुकीत सायलीवर गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या भागात कथानकात काय ट्विस्ट येणार जाणून घेऊया…

हेही वाचा : श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल पती बोनी कपूर यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “कठीण डाएट…”

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर महिपत आणि नागराजने पाठवलेले गुंड चाकूने वार करतात. बायकोवर वार झालेला पाहून अस्वस्थ झालेला अर्जुन तिला रुग्णालयात दाखल करतो. रुग्णालयात दाखल केल्यावर सायलीची प्रकृती गंभीर असून, तिला ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटाची आवश्यकता आहे असं डॉक्टरांकडून अर्जुनाला सांगितलं जातं.

हेही वाचा : Video : “तुम्ही सर्वांनी मोदक खाल्ले?”, श्रद्धा कपूरचा पापाराझींबरोबर मराठीतून संवाद, नेटकरी म्हणाले…

दुसरीकडे सायलीवर हल्ला झाल्याची माहिती चैतन्य आणि कल्पनापर्यंत पोहोचते. चैतन्य कल्पनासह प्रिया, रविराज किल्लेदार, अस्मिता सगळेजण रुग्णालयात सायलीला पाहण्यासाठी येतात. परंतु, कोणाचाही रक्तगट सायलीशी जुळत नाही. यावेळी सायली या कठीण प्रसंगातून नक्की बाहेर येईल असा विश्वास रविराज व्यक्त करतो. रविराजची सायलीविषयीची आपुलकी पाहून प्रियाला काहीसा धक्का बसतो.

लाडक्या लेकीच्या मदतीला येणार प्रतिमा

अभिनेत्री शिल्पा नवलकर ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रतिमा म्हणजेच तन्वीच्या आईची भूमिका साकारत आहेत. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य फक्त प्रतिमालाच माहिती असतं. तन्वी ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमाची मुलगी असल्याने लवकरच लाडक्या लेकीच्या मदतीसाठी प्रतिमा रुग्णालयात पोहोचणार आहे. सायलीचा ओ निगेटिव्ह रक्तगट प्रतिमाशी जुळत असल्याने ती सायलीला रक्त देणार असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या ७ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता प्रसारित करण्यात येईल. अर्जुन देवाची प्रार्थना करत असताना रुग्णालयात प्रतिमा आल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘या’ फोटोमधील एक मुलगा आहे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक; अलीकडेच प्रदर्शित झाली होती वेब सीरिज

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रतिमाच्या भूमिकेसाठी त्या कशा तयार होतात याची खास झलक शेअर केली होती. मालिकेत प्रतिमाचा भाजलेला चेहरा दाखवण्यासाठी त्यांनी खास प्रोस्थेटिक मेकअप केला होता.

Story img Loader