‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली. जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका गेली अनेक महिने टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. मालिकेत सध्या सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. त्यामुळे पुढे काय घडणार? सायली शुद्धीवर केव्हा येणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : मराठमोळ्या अभिनेत्याने रस्त्यालगतच्या दुकानात तळली गरमा गरम भजी, नेटकरी म्हणाले, “मानलं तुम्हाला…”

सायलीवर हल्ला झाल्यामुळे अर्जुन प्रचंड अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुसुम आणि प्रतिमा यांचा एकमेकींशी काहीच परिचय नसल्याने या दोघींची भेट झाल्याचं कालच्या भागात दाखवण्यात आलं. कुसुम प्रतिमाला उपचारासाठी रुग्णालयात नेते. तिथे सायलीचा रक्तगट ओ निगेटिव्ह असल्याने तिला रक्त कोण देणार? हा प्रश्न सुभेदार कुटुंबासमोर निर्माण झालेला असतो. अशावेळी सायली म्हणजेच तन्वीची खरी आई प्रतिमा रुग्णालयात आल्याने रक्ताचा प्रश्न सुटतो. प्रतिमा आणि सायलीचा रक्तगट एकच असतो. लाडक्या सुनेला डोनर मिळाल्यामुळे कल्पना सुभेदार आनंदी होतात.

हेही वाचा : रेणुका शहाणेंच्या लग्नात नणंदेने केलं होतं कन्यादान, नेमकं काय घडलं?

दुसरीकडे, प्रतिमा प्रत्येक गोष्ट हातवारे करून बोलत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुसुम त्यांना तुम्हाला बोलता येत नाही का? असा प्रश्न विचारते यावर प्रतिमा नकारार्थी मान डोलावते. यावरून नागराज आणि महिपत यांनी घडवलेल्या अपघातानंतर प्रतिमाची वाचा गेल्याचं स्पष्ट होत आहे. सायलीला रक्त दिल्यावर प्रतिमा पुन्हा माघारी निघते एवढ्यात कल्पना, अर्जुनचे वडील आणि रविराज किल्लेदार ( प्रतिमाचा नवरा) तिला दिसतात.

हेही वाचा : “आज अचानक पॅकअप नंतर…” प्रसाद ओक याला चाहत्यांनी दिला आश्चर्याचा धक्का, अनुभव सांगत म्हणाला…

सुभेदार कुटुंबीय आणि प्रतिमाची भेट होणार का? त्यांना रुग्णालयात पाहिल्यावर प्रतिमा पुढे काय करणार? हे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहे. याशिवाय पुढील भागात सायली शुद्धीवर आल्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सायलीला पाहून अर्जुनचे डोळे पाणवतात. त्यामुळे या हल्ल्याचा सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नात्यावर कसा परिणाम होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, मालिकेत आलेल्या या रंजक वळणामुळे या आठवड्यातही ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag marathi serial new twist saylis mother pratima can not talk new promo out sva 00