Tharala Tar Mag Marathi Serial Updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमाची सुभेदारांच्या घरात एन्ट्री झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अलिबागला जाऊन सायली प्रतिमाला शोधून काढते. एका मंदिरात मायलेकींची भेट झाल्यावर प्रतिमा सायलीला स्वत:ची ओळख ‘कविता’ अशी सांगते. पण, सायली या प्रतिमा आत्याच आहेत यावर ठाम असते. सायली अन् प्रतिमा दोघीही सुभेदारांच्या घरी येतात. एवढ्या वर्षांनी घरी परतलेल्या प्रतिमाला पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. पूर्णा आजीला अश्रू अनावर होतात. परंतु, प्रतिमा शेवटपर्यंत एकही शब्द बोलत नाही, ती फक्त सायलीला मागे उभी असते.

एकीकडे सायली प्रतिमाला धीर देत असते. तर, दुसरीकडे प्रतिमाला एवढ्या वर्षांनी घरात आलेलं पाहून सुभेदार कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. महिमतने केलेल्या हल्ल्यामुळे प्रतिमाच्या चेहऱ्यावर अपघाताच्या अनेक खूणा असतात. या सगळ्यापासून दूर प्रतिमा अलिबागला राहत असते. आता प्रतिमाला खरंच स्मृतीभ्रंश झालाय की, ती केवळ महिपतच्या गुंडांपासून वाचण्यासाठी प्रतिमा विस्मृती झाल्याचं नाटक करतेय याबद्दलची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.

Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने घेतली पहिली गाडी! सोबतीला होते आई अन् कुटुंबीय; म्हणाला, “संयमाची चार चाके…”

रविराज अन् प्रतिमा आले समोरासमोर ( Tharala Tar Mag )

‘ठरलं तर मग’ मालिकेत लेकीला एवढ्या वर्षांनी घरी आल्याचं पाहून पूर्णा आजी फारच भावुक होते. आता सुभेदार कुटुंबीय प्रतिमा घरी परतल्याची माहिती रविराज किल्लेदारांना देणार आहेत. किल्लेदार गेली कित्येक वर्षे बायकोच्या परत येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. सुभेदारांच्या घरी येऊन प्रतिमाला पाहताच त्यांना मोठा धक्का बसतो. आपली बायको जिवंत असल्याचं समजताच ते स्तब्ध होतात. रविराज किल्लेदारांबरोबर प्रिया, नागराज व त्याची पत्नी देखील सुभेदारांकडे आलेले असतात.

आता रविराज किल्लेदार म्हणजेच स्वत:च्या नवऱ्याला पाहिल्यावर प्रतिमाची स्मृती पुन्हा येईल का? ती सर्वांना ओळखू शकेल का? हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. एकीकडे प्रतिमाच्या येण्याचा आनंद असला तरीही दुसरीकडे अर्जुनच्या मनात एका नव्या संशयाने जागा निर्माण केली आहे. प्रतिमा जिवंत असेल तर, रुग्णालयातील रिपोर्ट्स खोटे कसे काय ठरले याबद्दल अर्जुन विचार करू लागतो. खरंतर ते रिपोर्ट्स प्रियाने बदललेले असतात. आता अर्जुन या सगळ्याचा शोध घेणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : नवीन होस्ट असणार रितेश देशमुख! ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही…

( Tharala Tar Mag )
( Tharala Tar Mag )

दरम्यान, आता प्रतिमाच्या पुन्हा येण्यामुळे प्रिया ही तन्वी नसून… अर्जुनची बायको सायली हीच खरी रविराज व प्रतिमा यांची मुलगी तन्वी असते हे सत्य सर्वांसमोर केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader