Tharala Tar Mag Marathi Serial Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली प्रतिमाचा शोध घेत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मधुभाऊंची तुरुंगातून सुखरुप सुटका करण्यासाठी अर्जुनला कोर्टात सादर करण्यासाठी पुरावे हवे असतात. यासाठी तो प्रियाशी प्रेमाचं नाटक करण्याचं ठरवतो. सायलीला देखील याची कल्पना असते परंतु, रेस्टॉरंटमध्ये प्रिया अन् अर्जुनला एकत्र डान्स करताना पाहून सायली प्रचंड संतापते.

अर्जुन बायकोची मनधरणी करत असतो परंतु, सायली काही करून ऐकत नसते. इतक्यात रस्त्याने जाणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असल्याचं सायली पाहते. ती लगेच धावत जावून त्या बाईंचा जीव वाचवते. ही महिला दुसरी तिसरी कोणीही नसून प्रतिमा असते. प्रतिमाच्या चेहऱ्यावर ओढणी व जखमा असल्याने सायली तिला पटकन ओळखत नाही. प्रतिमा सुद्धा सायलीला पाहून लगेच रिक्षात बसून निघून जाते. परंतु, सायलीला मनात कुठेतरी या प्रतिमा आत्याच असाव्यात याची खात्री असते.

हेही वाचा : तुमच्या घरातील Bigg Boss कोण? रितेश देशमुखने एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाला…

सायली घरी येऊन प्रतिमाचा फोटो सुभेदारांच्या घरातून खाली काढते आणि त्यावर स्केचपेन घेऊन जखमा रेखाटते, पांढऱ्या ओढणीने प्रतिमाचा अर्धा चेहरा झाकते. यानंतर रस्त्यात दिसलेली बाई आणि प्रतिमा आत्या एकच असल्याची खात्री सायलीला होते. अर्जुनला ती या सगळ्याची कल्पना देते पण, तो काही केल्या ऐकत नाही. “तुम्ही यात पडू नका” असा सल्ला तो सायलीला देतो. पण, सायली प्रतिमाचा शोध घेण्याचा निर्णय घेते. आता येत्या काळात ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे.

ठरलं तर मग ( Tharala Tar Mag ) मालिकेचा नवीन प्रोमो

सायली प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. प्रतिमा अनेक वर्षांनी सुभेदारांच्या घरी येऊन नि:शब्द होते. अर्जुन त्याच्या आत्याला पाहून थक्क होतो. तर, पूर्णा आजीला आपल्या लेकीला पाहून अश्रू अनावर होतात. मालिकेचा हा विशेष भाग २६ जुलै रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.

हेही वाचा : सुश्मिता सेन स्वतःला म्हणतेय ‘सिंगल’; तर रोहमन शॉल म्हणाला, “गेल्या सहा वर्षांपासून आम्ही…”

 Tharala Tar Mag
सायलीसह प्रतिमा पोहोचली सुभेदारांच्या घरी ( Tharala Tar Mag )
ठरलं तर मग ( Tharala Tar Mag ) नवीन प्रोमो : सौजन्य – sayali_arjun_fanpage इन्स्टाग्राम व स्टार प्रवाह वाहिनी

दरम्यान, प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्यावर आता मालिकेत काय ट्विस्ट येणार, प्रतिमा जिवंत असल्याचं सत्य नागराज, महिपतला समजल्यावर मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader