‘ठरलं तर मग’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत अर्जुनचा वाढदिवस आणि किल्लेदार कुटुंबीयांचा अपघात हा संपूर्ण सीक्वेन्स एकत्र दाखवण्यात येत आहे. सध्या सुभेदारांच्या घरात अर्जुनच्या वाढदिवसाची खास तयारी करण्यात येत आहे. सायलीसह कल्पना, कमल, प्रताप सगळेच त्याच्या वाढदिवसासाठी उत्साही आहेत. परंतु, या सगळ्या दरम्यान सायलीला वारंवार तिचे भूतकाळातील दिवस आठवत आहेत.
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सायली खास केक बनवणार आहे. तसेच घरात सजावट करण्यासाठी सायलीला संपूर्ण सुभेदार कुटुंब मदत करत असतं. अर्जुन बायकोने स्वत:च्या हाताने बनवलेला केक पाहून भलताच आनंदी होतो. अशातच केक कापताना सुभेदारांच्या घरात प्रियासह रविराज किल्लेदार येतात.
हेही वाचा : अमृता देशमुख – प्रसाद जवादेने लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल मांडलं मत; म्हणाले, “लग्नाआधी एकत्र राहिल्यामुळे…”
आपल्या सिनिअरला घरी आलेलं पाहून अर्जुनला प्रचंड आनंद होतो. सगळेजण वाढदिवासच्या उत्साहात मग्न असताना अचानक रात्री सायलीचा फोन वाजवतो. सायली फोन उचलून हॅलो म्हणते, इतक्यात अर्जुन एवढ्या रात्री तिला कोणाचा फोन आला असेल याबद्दल विचार करू लागतो. याशिवाय सायलीचं डोकं सकाळपासून गरगरत असल्याचं देखील त्याने पाहिलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला सायलीबद्दल काळजी वाटत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : स्वप्ननगरीत फुलणार नवीन नातं! दादा खोतांना समजेल का लेकीचं सत्य? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका रंजक वळणावर…
सायलीला हळुहळू अपघाताचा दिवस जवळ आल्यावर तिचे भूतकाळातील दिवस आठवत आहेत. तिच्या डोक्यावर प्रचंड ताण आलेला असूनही अर्जुनच्या वाढदिवसाची ती मोठ्या आवडीने तयारी करते. आता येणाऱ्या भागात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचं या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. सायलीला एवढ्या रात्री कोणी फोन केला? तिला भूतकाळ आठवेल का? याचा उलगडा आगामी भागांमध्ये होणार आहे.