Tharala Tar Mag Upcoming Episode : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रिया व अर्जुन दोघेही जेवायला बाहेर रेस्टॉरंटमध्ये जातात. एवढ्यात सायली या दोघांना एकत्र डान्स करताना पाहते. प्रिया-अर्जुनला एकत्र पाहून सायलीचा संताप होतो. याबद्दल ती अर्जुनला पुन्हा एकदा जाब विचारते. “मधुभाऊंच्या केससाठी मी तुम्हाला प्रियाबरोबर डान्स करा हे सांगितलं नव्हतं” असं ती अर्जुनला सांगते. बायकोची मनधरणी कशी करावी हे अर्जुनला समजत नसतं.

सायली व अर्जुन एकमेकांशी बोलत असताना रस्त्यावरून जाणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असतो. या बाईला सायली वाचवते. त्या बाईच्या चेहऱ्यावर जखमा असल्याने एका बाजूने पूर्ण चेहरा ओढणीने झाकलेला असतो. ही बाई दुसरी-तिसरी कोणीही नसून सायली म्हणजेच तन्वीची खरी आई प्रतिमा असते. हीच प्रतिमा अर्जुनची आत्या लागत असते. त्यामुळे सायली तिला अर्जुनची आत्या या नात्यानेच ओळखत असते. चेहरा झाकलेला असल्याने तिला प्रतिमाची खरी ओळख पटकन समजत नाही.

tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Tharla Tar Mag Promo
ठरलं तर मग : अर्जुन पोहोचला बायकोच्या माहेरी, एकत्र पतंग उडवताना मधुभाऊंची एन्ट्री! पुढे जावयाने केलं असं काही…; पाहा प्रोमो
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
2 fans died after Game Changer event
अल्लू अर्जुननंतर राम चरणच्या सिनेमाच्या कार्यक्रमाला गालबोट; दोन चाहत्यांचं निधन, निर्मात्यांनी मदतीची केली घोषणा
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

हेही वाचा : “१८व्या वर्षी मुलाखतीत सेक्स शब्द उच्चारला अन्…”, सुश्मिता सेनने सांगितला प्रसंग; म्हणाली, “माझ्या आई-बाबांनी मला…”

अर्जुन सायलीला बजावणार (Tharala Tar Mag)

सायली घरी आल्यावर प्रतिमाचा फोटो घेते त्यावर पेनाने जखमा रेखाटते आणि त्यानंतर तिच्या फोटोवर पांढरी ओढणी ठेवते. यामुळे प्रतिमाचा चेहरा जसा पाहिला तसा हुबेहूब सायलीच्या डोळ्यासमोर येतो. यामुळे रस्त्यावर भेटलेली बाई दुसरी तिसरी कोणीही नसून प्रतिमा आत्याच आहेत अशी खात्री सायलीला पटते. ती लगेच अर्जुनला प्रतिमाचं सत्य सांगायला जाते. परंतु, तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. “प्रतिमा आत्याचा मृत्यू झाला असून तुम्ही सुद्धा यात लक्ष घालू नका” असं तो सायलीला बजावतो. पण, प्रतिमाचा मृत्यू झालाय हे सत्य सायली स्वीकारायला तयार नसते. अर्जुन हात जोडून “तुम्ही यात पडू नका” असं सायलीला सांगत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “मी बॉलीवूडमधील दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि माझी ओळख…”,रणबीर कपूरचा खासगी आयुष्यावर खुलासा

(Tharala Tar Mag)
arjun
अर्जुन सुभेदार

एकीकडे प्रतिमावरून सायली-अर्जुनमध्ये वाद सुरू असतात तर, दुसरीकडे प्रतिमाचा फोटो गेला कुठे हा विचार करून पूर्णा आजी तणावात गेल्याचं पुढच्या भागात पाहायला मिळेल. आता सायली कोणाच्याही मदतीशिवाय प्रतिमाला कशी शोधून काढणार तिची यामध्ये नेमकी कोण साथ देणार या गोष्टी मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळतील.

Story img Loader