‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच अर्जुन-सायलीच्या हनिमूनचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही फक्त कल्पनाची इच्छा असल्याने दोघेही हनिमूनला जाणार आहेत. या विशेष भागाचं चित्रीकरण करण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेची संपूर्ण टीम एका दिवसासाठी माथेरानला रवाना झाली होती. याचे बरेच फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच मालिकेची खलनायिका प्रियाचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर चर्चेत आले आहेत.

अर्जुनची बहीण अस्मिता ही सुभेदारांच्या घरातील सगळ्या अपडेट्स प्रियाला देत असते. सायली-अर्जुनचं लग्न खोटं असून, दोघांनीही फक्त मधुभाऊंच्या केससाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्याचा संशय आधीपासूनच प्रियाला असतो. त्यामुळे अस्मिताने हनिमूनबद्दल माहिती दिल्यावर प्रिया सायली-अर्जुनच्या मागोमाग माथेरानला जायचं ठरवते.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

हेही वाचा : शालेय कार्यक्रमात मराठी अभिनेत्याने लेकीसह केला डान्स! ‘तो’ सुंदर व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले, सर्वत्र होतंय कौतुक

अर्जुन-सायलीने आपल्याला ओळखू नये म्हणून संपूर्ण वेशांतर करून प्रिया माथेरानमध्ये जाणार आहे. सध्या या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये प्रेक्षकांना प्रियाचे छोटे केस, डोळ्यावर कॉल असा हटके लूक पाहायला मिळत आहे. आता या दोघांच्या मागोमाग प्रिया माथेरानला गेल्याने मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : Video : “ती सून नव्हे तर…”, स्वानंदी टिकेकरबद्दल काय म्हणाले सासू-सासरे? अभिनेत्रीने शेअर केला लग्नातील Unseen व्हिडीओ

दरम्यान, हनिमून विशेष भागांत सायली-अर्जुनमधील नातं कसं बहरणार? दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांचा पाठलाग करत माथेरानला पोहोचलेल्या प्रियाच्या हाती नेमका कोणता पुरावा लागणार, सायली-अर्जुनचा खरा प्लॅन तिला कळेल का? असे असंख्य प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये मालिकेचं आणि प्रियाच्या या नव्या लूकचं भरभरून कौतुक केलं आहे.

Story img Loader