‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. रंजक कथानकामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सध्या मालिकेत नवरात्रौत्सवाचा सीक्वेन्स सुरू आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर घरी आलेल्या जोगतीणीकडून सायली-अर्जुनला आशीर्वाद मिळतो. एकीकडे अर्जुनच्या मनात सायलीबद्दल प्रेम निर्माण होत असताना दुसरीकडे सायलीच्या मनात कॉन्ट्रॅक्ट मेरेजमुळे अर्जुनबद्दल परकेपणाची भावना असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विवेक ओबेरॉयच्या लग्नाला गेल्या होत्या त्याच्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंड्स, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा…

सायली तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च एका डायरीत लिहून ठेवते. जवळपास साडेदहा लाखांची परतफेड मी लवकरच करेन हे वाक्य सायलीच्या तोंडून ऐकल्यावर अर्जुन तिच्यावर प्रचंड संतापतो आणि निघून जातो. दुसऱ्या बाजूला प्रिया-अस्मिताच्या षडयंत्रांमुळे पूर्णा आजीदेखील सायलीवर रागावते. सायलीने अर्जुनच्या आयुष्याचा सत्यानाश केला असा दोष ती देते. यावर कल्पना व विमल पूर्णा आजीला समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु, स्वप्नात प्रतिमाचा भास झाल्याने पूर्णा आजी कोणाचंही ऐकून घेत नाही. त्यामुळे सुभेदारांच्या घरात एकंदर नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा : “आम्ही दोघे वेगळे झालोय…” शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

सायली घडला प्रकार पाहून नाराज होते. अनेकदा अर्जुनची माफी मागितल्यानंतरही तो तिच्याशी बोलण्यास नकार देतो. शेवटी सायली गुडघ्यावर बसून अर्जुनची कान धरुन माफी मागते. त्याला मला एकदा माफ करा, हवंतर गडबड घोटाळा म्हणा पण, माफ करा अशी विनंती करते.

हेही वाचा : “वहिदा रेहमान यांना भूमिका द्या, त्यांना…” निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली खंत

सायलीने कान धरल्याचं पाहून अर्जुनला मनात तिची दया येते परंतु, तो असं चेहऱ्यावर अजिबात काही दाखवत नाही. आता अर्जुन सायलीला माफ करणार का? अर्जुनला सायलीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.