‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या दिवाळीचा सीक्वेन्स सुरू आहे. सायली-अर्जुनची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे सुभेदारांच्या घरात विशेष तयारी करण्यात येत आहे. पण, आता लवकरच मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सर्वांपासून आपली ओळख लपवून फिरत असलेली प्रतिमा आता सुभेदारांच्या घरापर्यंत येऊन पोहोचणार आहे.
हेही वाचा : दिवाळीनिमित्त शिवतीर्थावर पोहोचली तेजस्विनी पंडित, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, “हे सगळं…”
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या प्रेक्षकांना आता सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य माहीत झालं आहे. प्रतिमा ही तन्वीची आई आणि पूर्णा आजीची लेक असते. नागराज आणि महिमतच्या गुंडांनी प्रतिमाला जीवे मारण्याचा कट रचल्याने एवढे दिवस ती मालिकेत सर्वांपासून आपली ओळख लपवून फिरत आहे. अखेर लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रतिमा आपल्या माहेरी म्हणजेत सुभेदारांच्या घरी येऊन पोहोचते.
सायली(तन्वी) प्रतिमाची खरी लेक असल्याने आईच्या येण्याची चाहूल तिला लागते. ती पूजा सोडून पळत-पळत दरवाजाकडे येते. एवढ्यात प्रतिमा तिच्याजवळचं नाणं रांगोळीवर ठेऊन निघून जाते. हे नाणं सायलीच्या हाती लागतं. पूर्णा आजीला लक्ष्मीचं नाणं पाहिल्यावर प्रतिमाची आठवण येते. ती उपस्थितांना हे प्रतिमाचं नाणं असल्याचं सांगते.
हेही वाचा : ‘टायगर ३’ ची दणक्यात सुरुवात, सलमान-कतरिनाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले ‘तब्बल इतके कोटी
प्रतिमाचं नाणं रांगोळीवर पडलेलं सापडल्याने सुभेदारांना ती जिवंत असल्याची खात्री पटते. याशिवाय प्रतिमा आल्याची चाहूल सायलीला कशी लागली याबद्दल सुभेदार कुटुंबीय आश्चर्यचकित झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मालिकेचा हा विशेष भाग येत्या १६ नोव्हेंबरला प्रसारित करण्यात येणार आहे. मालिकेत प्रतिमा आणि सायली या मायलेकींची भेट केव्हा होईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.