Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनी प्रतिमा घरी परत आल्याने सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबीय यंदाचा गणेशोत्सव एकत्र साजरा करणार आहेत. यंदा गणरायाची प्रतिष्ठापना प्रतिमाच्या हस्ते व्हावी अशी पूर्णा आजीची मनापासून इच्छा असते आणि घरचे सुद्धा या गोष्टीसाठी तयार होतात.

एकीकडे घरात आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे, प्रियाच्या मनात भितीचं वातावरण तयार होतं. सायलीबरोबर बाप्पाची पूजा करताना प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवला तर काय करायचं? असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येतात. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी प्रिया सायलीच्या दूधात झोपेच्या गोळ्या मिसळते. मात्र, प्रियाचा डाव तिच्यावरच उलटतो. पूजेच्या दिवशी सगळे वेळेवर हजर होतात आणि फक्त प्रिया झोपून राहते.

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
nagpur leopard latest news in marathi
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

हेही वाचा : जान्हवीच्या गळ्यात निक्कीचा फोटो, तर अरबाजकडे…; ‘बिग बॉस’च्या घरात अनोखा नॉमिनेशन टास्क; नेमकं काय घडणार, पाहा…

सुभेदारांच्या घरी खास स्पर्धा

प्रिया वेळेवर न आल्याने आता बाप्पाची पूजा प्रतिमा-रविराजबरोबर सायली करेल असा निर्णय पूर्णा आजी घेते. या तिघांना एकत्र आरती करताना पाहून प्रिया प्रचंड संतापते. ती तशीच अंघोळ न करता बाहेर येते आणि सायलीच्या हातातून आरतीचं ताट हिसकावण्याचा प्रयत्न करते. हा प्रकार पाहून रविराज प्रियाच्या कानाखाली मारतात. आता समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये ( Tharala Tar Mag ) सुभेदारांच्या घरात मोदक बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रिया, प्रतिमा, सायली आणि कल्पना या चौघींमध्ये सर्वात चांगले मोदक कोणी केले याची निवड पूर्णा आजी करणार असते. सर्वप्रथम रविराज प्रियाला ( खोटी तन्वी ) तिने केलेले मोदक दाखवण्यास सांगतात. प्रियाच्या मोदकाचा आकार पाहून सर्वांना हसु अनावर होतं. अगदी अर्जुन सुद्धा “हा मोदक आहे का?” असा प्रश्न तिला विचारतो आणि तिची खिल्ली उडवतो. यानंतर सगळेजण प्रतिमा व सायली यांनी बनवलेले उकडीचे मोदक दाखवायला सांगतात.

Tharala Tar Mag
ठरलं तर मग मालिका ( Tharala Tar Mag )

हेही वाचा : “निक्कीसाठी राखी सावंतच योग्य आहे”, सुरेखा कुडची यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “यांच्या वरचढ जर कोणी…”

सायली – प्रतिमाने अगदी एकसारखे मोदक बनवल्याचं पाहून पूर्णा आजीला धक्का बसतो. ती आश्चर्यचकीत होत म्हणते, “इतके एकसारखे मोदक… असं वाटतंय मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवत हे मोदक बनवलेत. याच दोघी विजेत्या आहेत.” यानंतर अर्जुन एकच जल्लोष करतो. तर, प्रियाचं तोंड मात्र पूर्णपणे पडतं.

दरम्यान, आता हळुहळू सगळे कुटुंबीय प्रियाच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे आता मालिकेत ( Tharala Tar Mag ) प्रतिमाची स्मृती केव्हा परत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, प्रतिमाची स्मृती परत आल्यावरच सुभेदारांसमोर प्रियाचा खरा चेहरा उघड होणार आहे.

Story img Loader