Tharala Tar Mag New Episode Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमा सुभेदारांच्या घरी परतल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सायली जवळपास २० वर्षांनी प्रतिमाला पुन्हा एकदा घरी घेऊन येते. तिच्या येण्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण होतं. परंतु, प्रतिमाला जुन्या गोष्टी काहीच आठवत नसतात. महिपतने केलेल्या हल्ल्यामुळे तिची स्मृती गेलेली असते. प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवावा यासाठी सुभेदारांसह रविराज किल्लेदार प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकीकडे सायली, कल्पना, पूर्णा आजी प्रतिमाची स्मृती परत यावी यासाठी प्रयत्न करत असतात तर, दुसरीकडे प्रिया प्रतिमाला काहीच आठवू नये याची प्रार्थना करत असते. कारण, प्रिया खोटी तन्वी बनून किल्लेदारांच्या घरी गेलेली असते. हे सत्य प्रतिमाची स्मृती परत आल्यास सर्वांसमोर येईल याची भीती प्रियाच्या मनात असते. याशिवाय सत्य समोर आलं तर, किल्लेदार घरातून बाहेर काढतील आणि आपण रस्त्यावर येणार… याची जाणीव देखील तिला असते.

हेही वाचा : “निक्की तू किती Hopeless आहेस हे जनतेला…”, रक्षाबंधनाच्या दिवशी नात्यात फूट! घन:श्यामने सुनावलं, पाहा प्रोमो

सायलीचं गाणं ऐकून प्रतिमा झाली भावुक

सायली, कल्पना व पूर्णा आजी मिळून प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी योजना आखतात. तिला स्वयंपाक घरात वेगवेगळे पदार्थ करायला लावतात. जेणेकरून प्रतिमा आधीसारखी सुभेदारांच्या घरात रुळेल आणि हळुहळू तिला भूतकाळ आठवेल अशी खात्री सायलीला असते. आपली बायको प्रतिमा आत्यासाठी एवढं करतेय हे पाहून अर्जुन सुद्धा भारावून जातो.

सुभेदार कुटुंबीय एकत्र बसलेले असताना सायली “का रे दुरावा…का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला” हे गाणं गात असते. तिचं गाणं सगळे मन लावून ऐकत असतात. सायलीचं गाणं दूर दरवाजात बसलेली प्रतिमा सुद्धा ऐकत असते. शेवटी न राहून प्रतिमा लेकीजवळ येते आणि तिला घट्ट मिठी मारते. दोघींना अश्रू अनावर झाल्याचं या प्रोमोमध्ये ( Tharala Tar Mag ) पाहायला मिळत आहे.

ठरलं तर मग ( Tharala Tar Mag ) फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी

हेही वाचा : Video : कोल्हापुरी हलगीवर ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे यांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “तोड नाही…”

सायली आणि प्रतिमाचं हे नातं पाहून घरातले सगळेच भारावून जातात तर, प्रियाला या सगळ्या गोष्टींचा धक्का बसतो. सायली अशीच प्रतिमाच्या जवळ गेली तर आपल्या अस्तित्त्वाला धोका होणार याची खात्री प्रियाला असते. मालिकेतील हा भावुक क्षण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सायलीच्या प्रयत्नांनी जर अशीच प्रतिमाची स्मृती पुन्हा आली तर, ( Tharala Tar Mag ) मालिकेत काय नवीन वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.