Tharala Tar Mag Maha Episode : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमा जवळपास २० वर्षांनी सुभेदारांच्या घरी परतल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रतिमा घरी परत आल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं. पूर्णा आजी, प्रताप, कल्पना, रविराज किल्लेदार सगळेच आनंदी असतात. पण, संपूर्ण घर आनंदी असताना आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अर्जुनच्या खोलीत जाणाऱ्या प्रियाला सायली अडवायला जाते. पण, प्रिया तिचा हात झटकून तिला जिन्यावरून ढकलते. यामुळे सायलीचा तोल जाऊन ती खाली पडते. अर्जुनसह सगळे सुभेदार कुटुंबीय सायलीच्या मदतीसाठी खाली जातात. परंतु, तोपर्यंत ती बेशुद्ध झालेली असते. सगळेजण तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात. एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे, नागराज, महिपत आणि प्रिया मिळून प्रतिमाचा खून करण्याचा प्लॅन बनवत असतात.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्कीबद्दल अभिजीतने घेतला मोठा निर्णय! सूरज-अरबाजसह सर्वांनी ठोकला सॅल्यूट; ‘पाताळ लोक’ टास्कमध्ये काय घडणार?
प्रतिमाची स्मृती परत आल्यास ते सर्वांसाठी धोक्याचं ठरेल. यापेक्षा तिला मारून टाकल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील असा विचार करून नागराज आणि महिपत आता प्रतिमाला मारण्यासाठी गुंड पाठवणार आहेत. खरंतर, एवढे दिवस सायली सतत प्रतिमाबरोबर असल्याने तिच्या जीवाला कोणताही धोका नव्हता. परंतु, सायलीच्या मेंदूला मार लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याचाच फायदा आता नागराजचे गुंड घेणार आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेचा महाएपिसोड
मालिकेत ( Tharala Tar Mag ) दहीहंडी उत्सव सुरू असताना प्रतिमाला जीवे मारण्यासाठी नागराजचे गुंड येतात. तिला मारण्यासाठी ते सुरा काढतात. एवढ्यात दहीहंडीवर चढून अर्जुन प्रतिमा आत्याचा जीव धोक्यात असल्याचं पाहतो. सायलीची मृत्यूशी झुंज सुरू असताना, दुसरीकडे प्रतिमाचा जीव सुद्धा धोक्यात असल्याचं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता अर्जुन प्रतिमाचा जीव वाचवू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : ऑनलाइन TRP मध्ये ‘बिग बॉस मराठी’ची लोकप्रिय मालिकांना टक्कर! थेट टॉप-५ मध्ये एन्ट्री, पाहा संपूर्ण यादी
‘ठरलं तर मग’ मालिकेचा ( Tharala Tar Mag ) हा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ६ वाजता प्रसारित केला जाणार आहे. सायली आजारी असताना प्रतिमाला वाचवणं ही अर्जुनची मुख्य जबाबदारी असते. आता अर्जुन ही जबाबदारी निभावेल का? आणि सायली सुभेदारांच्या घरी मरणाच्या दारातून परतणार की नाही? याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागांमध्ये होणार आहे. सध्या मालिकेतील या निर्णायक वळणाला प्रेक्षकांची देखील पसंती मिळत आहे.