Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायली एकमेकांसमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. याचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या समोर आला. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धतीत विवाहबंधनात अडकल्यावर अर्जुन-सायली हळुहळू खरंच एकमेकांच्या प्रेमात पडतात. आता क्षण आलाय तो प्रेम व्यक्त करण्याचा…पण, या सगळ्यात एक नवीन ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स कल्पनाच्या हाती लागणार आहेत. दोघंही बाहेरून फिरून आल्यावर संपूर्ण सुभेदार कुटुंब त्यांच्यासमोर उभं राहिलेलं असतं. सगळ्यांना एकत्र पाहून अर्जुन-सायली मोठ्या काळजीत पडतात. कल्पना तर प्रचंड भडकलेली असते. ती पुढे येऊन, अर्जुनला सणसणीत कानाखाली वाजवून कॉन्ट्रॅक्ट लग्नाबद्दल जाब विचारणार आहे. हे सगळं घडत असताना किल्लेदार कुटुंबीय सुद्धा उपस्थित असतात. एकीकडे, प्रतिमाला सायलीची काळजी वाटत असते पण, दुसरीकडे प्रिया मात्र हा सगळा ड्रामा एन्जॉय करताना दिसते. यावरूनच हा सगळा प्लॅन प्रियाचा असणार हे स्पष्ट झालं होतं. पण, आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केलेल्या एका नव्या प्रोमोमुळे हा प्लॅन प्रियाचाच आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

हेही वाचा : Video: जगणं हे न्यारं झालं जी…; ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडने पहिल्यांदाच होणाऱ्या पत्नीसह Reel व्हिडीओ केला शेअर, पाहा

‘स्टार प्रवाह’ने मालिकेचा जबरदस्त प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये प्रिया म्हणते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्जुन-सायली. माझ्या दोन आवडत्या व्यक्तींचे एकाच दिवशी वाढदिवस आहेत. मग गिफ्ट पण एकदम धमाकेदार असायला हवं ना? हे बघा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स…आता नाही देणार हा, थेट वाढदिवसाला देणार! हे वर्ष आणि अर्जुन-सायलीचं नातं लवकरच संपणार…” यानंतर प्रिया सायली-अर्जुनचं नाव लिहिलेल्या केकवर उभा चाकू मारते आणि विक्षिप्तपणे हसत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Tharala Tar Mag

‘ठरलं तर मग’ मालिकेचा ( Tharala Tar Mag ) हा बहुप्रतिक्षीत भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियाचा हा खुनशी प्लॅन पाहिल्यावर नेटकऱ्यांमध्ये देखील चर्चा रंगली आहे. अनेकांनी हा प्रोमो पाहून जुन्या मालिकांची पुन्हा एकदा आठवण झाली असं म्हटलं आहे. त्यामुळे आता येत्या काळात ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना एकापेक्षा एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतील.

हेही वाचा : गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”

आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड झाल्यावर सुभेदार कुटुंबीय सायलीला घराबाहेर काढणार की अर्जुन यातून मार्ग काढणार हे लवकरच ( Tharala Tar Mag ) स्पष्ट होणार आहे.