Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमा सुभेदारांच्या घरी परतल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रतिमा जवळपास २० वर्षांनी घरी परतल्यामुळे सुभेदार कुटुंबीय मोठ्या आनंदाने रक्षाबंधन साजरं करत असतात. प्रतिमा घरी आली असली तरीही, ती अद्याप कोणातही मिसळलेली नाही. ती केवळ सायलीशी बोलत असते. प्रतिमाची स्मृती परत यावी यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. स्वयंपाक घरात विविध पदार्थ बनवले, घरात एकत्र वावरलं तरंच प्रतिमाची स्मृती पुन्हा येईल. याची खात्री सायलीला असते. त्यामुळे पूर्णा आजी, कल्पना आणि सायली अशा तिघी जणी मिळून प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी विविध योजना बनवतात. तर, दुसरीकडे प्रिया नागराज-महिमतच्या मदतीने प्रतिमाला जीवे मारण्याचा प्लॅन बनवत असते.

प्रतिमाची स्मृती पुन्हा येणं हे सर्वात जास्त घातक प्रियासाठी ठरणार असतं. कारण, ती किल्लेदारांच्या घरी खोटी तन्वी बनून वावरत असते. परंतु, खरी तन्वी सायलीच असते. त्यामुळे प्रतिमाला या सगळ्या गोष्टी आठवल्यावर आपला खोटेपणा उघड झाला तर, काहीच हाती लागणार नाही याची पुरेपूर जाणीव प्रियाला असते. त्यामुळे नागराजच्या साथीने प्रतिमाला जीवे मारण्यासाठी प्रिया तयार होते. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरू असताना मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”

हेही वाचा : “रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”

Tharala Tar Mag : सायली झाली बेशुद्ध

प्रतिमा घरी आल्यापासून रविराज आणि प्रिया सुभेदारांकडे राहायला गेले असतात. याशिवाय अर्जुन देखील मधुभाऊंच्या केससाठी प्रियाशी चांगला वागत असतो. त्यामुळे प्रिया वारंवार अर्जुन-सायलीच्या रुममध्ये जात असते. याआधीच सायलीने प्रियाला “सारखं आमच्या खोलीत जायचं नाही” अशी ताकीद दिलेली असते. परंतु, प्रिया सायलीला न जुमानता पुन्हा एकदा अर्जुनच्या खोलीच्या दिशेने जायला निघते. सायली तिला जिन्यातच अडवते आणि “तुला किती वेळा सांगायचं तुझी खोली खालीये वरती नाही” असं सांगते.

प्रिया यावर सायलीला म्हणते, “तुझा नवरा मला म्हणाला, मी कधीही त्याच्या खोलीत येऊ शकते. त्यामुळे त्या खोलीत जाण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये… मला अर्जुनने बोलावलंय.” एवढ्यात सायली तिचा हात धरून तिला वर जाण्यापासून अडवते. पण, प्रिया सायलीचा हात झटकून तिला ढकलते. प्रियाने धक्का दिल्याने सायलीचा तोल जाऊन ती जिन्यावरून घसरते आणि बेशुद्ध होते.

Tharala Tar Mag
Tharala Tar Mag : ( फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )

हेही वाचा : राज्यात लवकरच ७५ चित्रनाट्यगृहे; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात घोषणा

अर्जुन सायलीला जिन्यावरून घसरताना पाहून बिथरून जातो. सायली… असा आवाज देत तो पटकन खाली येतो. अर्जुन सायलीला खाली येऊन पाहतो तेवढ्यात ती बेशुद्ध झालेली असते. घरातले इतर सगळेजण देखील सायलीला पाहण्यासाठी येतात. आता सायली शुद्धीवर येणार की, मालिकेत ( Tharala Tar Mag ) पुन्हा नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader