‘स्टार प्रवाह’ वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अव्वलस्थानी आहे. आता लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक नवीन मालिका या वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेचं नाव आहे ‘घरोघरी मातीच्या चुली’. या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं, तर छोटी-मोठी भांडणं होतातच मात्र, या घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे याच आपल्या माणसांची गोष्ट ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रमुख भूमिका साकारणार असून, या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. सध्या टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेची निर्मिती देखील सुचित्रा बांदेकरांचं सोहम प्रोडक्शन करत आहे. त्यामुळे ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार? ही मालिका ‘ठरलं तर मग’ला टक्कर देईल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

हेही वाचा : १९ वर्षांनंतर येणार ‘नवरा माझा नवसाचा २’! चित्रपटाच्या नव्या भागात आहे दिग्गज कलाकारांची फौज, नावं आली समोर

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मा शिंदे जानकी हे महत्त्वाचं पात्र साकारणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, ‘रंग माझा वेगळा मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती. स्टार प्रवाहने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन जानकी साकारण्याची संधी दिली आहे. जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली. माझ्या स्टार प्रवाहच्या परिवारात पुन्हा येतेय याचा वेगळा आनंद आहे.”

हेही वाचा : “अनुपम सरांनी मेसेज करून माफी…”, सई ताम्हणकरने सांगितला फिल्मफेअरचा किस्सा; म्हणाली, “रणवीरने…”

दरम्यान, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.