स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील नंबर एकवर आहे. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सध्या मालिकेत सायली ही साक्षीविरोधात पुरावे गोळा करते आणि अर्जुन व सायली हे दोघे साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर आणतात याचा सीक्वेल सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साक्षीविरोधात सापडलेल्या पुराव्यांमुळे आता अर्जुन, सायली आणि चैतन्य साक्षीविरुद्धात नवी खेळी खेळणार असल्याचं दिसतंय. परंतु, चैतन्यनं साखरपुड्याआधीच साक्षीला अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितलं. या सत्यामुळे आता दोघांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे.

हेही वाचा… VIDEO: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली आणि चैतन्य-साक्षीने केला साखरपुड्यादिवशी मजेशीर डान्स; चाहते म्हणाले, “वेडे आहात तुम्ही”

सोमवारी (६ मे) प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडचा प्रोमो नुकताच समोर आलाय. या प्रोमोमध्ये प्रियाला अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळतं आणि हे सत्य सांगायला ती सुभेदार कुटुंबाच्या घरी जाते. प्रिया पूर्णाआजीला म्हणते, “यांनी लग्नासारख्या पवित्र गोष्टीच कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलंय. अर्जुन व सायलीचं लग्न खोटं आहे.” प्रियाच्या या बोलण्यावर पूर्णाआजीचा राग अनावर होतो आणि पूर्णाआजी सायलीला खेचून मंदिरात नेते. पूर्णाआजी म्हणते, “चल माझ्याबरोबर आणि देवासमोर शपथ घे की, तुमचं लग्न खरं आहे” यावर सायली देवापुढे हात ठेवते आणि म्हणते, “हो, आमचं लग्न खरं आहे.”

https://www.instagram.com/p/C6cutdnKhdN/

मग पूर्णाआजी सायलीला विचारते, “तुझं अर्जुनवर खरं प्रेम आहे.” त्यावर सायली शपथ घेते आणि म्हणते, “हो, माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे.”

हेही वाचा… “मी चुकून अभिनेता झालो”, महाराष्ट्र बंद नसता तर आमिर खान झाला नसता सुपरस्टार, अभिनेता किस्सा सांगत म्हणाला…

एका बाजूला सायली अर्जुनबद्दलच्या खऱ्याखुऱ्या भावना सर्वांसमोर मांडते. त्यामुळे अर्जुनदेखील त्याच्या मनातल्या भावना सायलीला सांगेल का? आणि या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर खऱ्या लग्नामध्ये होईल का? त्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्याला वेगळं वळण येईल की त्यांचं नातंच संपुष्टात येईल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

हेही वाचा… “दोनवेळचं जेवण मिळायचं नाही”, अभिजीत खांडकेकरने सांगितला पहिल्या मालिकेतील ‘तो’ अनुभव, म्हणाला…

तर, दुसऱ्या बाजूला सुभेदार कुटुंबीय नक्की प्रियाची बाजू घेतील की सायलीच्या बाजूने ठामपणे उभे राहतील? सायलीच्या या सत्यावर सगळ्यांचा विश्वास बसेल का? याचा उलगडा पुढील भागांमध्ये होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag promo priya tells sayali arjun contract marriage truth to subhedar family dvr