स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सध्या मालिकेत सायली अर्जुनच्या कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींबरोबर रियुनियन पार्टीला जाते, याचा सीक्वेन्स सुरू आहे. त्या पार्टीला अर्जुनचा मित्र चैतन्य साक्षीला घेऊन येतो आणि तिची ओळख होणारी बायको अशी करून देतो.
सोमवारी (२२ एप्रिल) प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडचा प्रोमो नुकताच समोर आलाय. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये सायलीला अर्जुनच्या कॉलेजमधला एक फोटो सापडतो. तो फोटो अर्जुनला दाखवत सायली म्हणते, “सर तुमचा कॉलेजचा फोटो. यात कुणालबरोबर साक्षी का आहे?” सायलीने फोटो दाखवल्यावर अर्जुन दचकून उठतो आणि म्हणतो, “कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती. साक्षीने नाकारल्यामुळे कुणालने आत्महत्या केली होती आणि हीच साक्षी आता चैतन्यच्या मागे लागलीय. मला आता माझ्या आणखी एका मित्राला गमवायचं नाही आहे मिसेस सायली.”
हेही वाचा… “तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…
अर्जुन हताश होऊन अश्रू गाळत हे सगळं सायलीला सांगतो. अर्जुनला खचलेला पाहून सायली त्याला म्हणते, “असं खचून जाऊ नका सर, आपण आताच्या आता चैतन्यला पुराव्यांसकट सगळं सांगूया आणि सगळ्यांसमोर सत्य आणूया.”
एका बाजूला साक्षीने चैतन्यला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून सत्यापासून वंचित ठेवलंय. साक्षीमुळे अर्जुन आणि चैतन्यच्या मैत्रीमध्येही फूट पडली. चैतन्य आणि अर्जुन पुन्हा एकदा चांगले मित्र व्हावेत याची प्रेक्षक वाट पाहतायत.
हेही वाचा… “आई तू लग्न कधी करणार?”, अरहान खानने मलायका अरोराला प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…
चैतन्यला आता तरी साक्षीचा खरा चेहरा कळणार का? साक्षीचं सत्य चैतन्यसमोर आणण्यास अर्जुन आणि सायली यशस्वी होणार का? याचा उलगडा पुढील भागांमध्ये होईल.