Tharala Tar Mag Fame Purna Aaji : स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच आघाडीवर असते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अर्जुन, प्रिया, कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता अशी मालिकेतील ही सगळीच मंडळी घराघरांत लोकप्रिय आहेत. ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीचं पात्र ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं आहे. नुकतीच त्यांनी स्वत:ची नवीन गाडी घेतली आहे. याबद्दल त्यांची लेक तेजस्विनी पंडीतने खास पोस्ट शेअर करत आईचं कौतुक केलं आहे.
ज्योती चांदेकर ( Tharala Tar Mag ) यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. गेली अनेक वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. तेजस्विनीला एक मोठी बहीण देखील आहे. नुकतीच वयाच्या ६८ व्या वर्षी ज्योती यांनी नवीन गाडी घेतली आहे.
तेजस्विनी पंडीतची आईसाठी खास पोस्ट
ज्योती चांदेकर
५२ वर्षाची कारकीर्द! आजतागायत २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आणि मग माझी आई. आई यासाठी नंतर कारण काही व्यक्तिमत्त्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात. आईने काम सुरु केलं तेव्हा ती १२ वर्षांची होती
मग तिचं लग्न झालं तरी तिने काम करणं सोडलं नाही. मग २ मुली झाल्या. आम्हाला बरोबर घ्यायची आणि ‘ती’ कायम काम करायची. मग मुली कमवायला लागल्या तरीही ‘ती’ काम करतच होती आणि अजूनही ‘ती’ काम करतेच आहे.
To cut it short,
या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती.
खूप फिरले… बसने, ट्रेनने, लोकल गाड्यांनी, आधी बाबाने घेतलेल्या, मग लेकीने घेऊन दिलेल्या, मग काही काळ धैर्यच्या गाडीने प्रवास केला… आता मला माझी गाडी हवी आहे आणि शेवटी या हट्टी बाईने, माझ्या आईने वय वर्ष ६८ व्या वर्षी तिच्या कमाईची, स्व:कष्टाची, स्वतःची गाडी घेतलीच!
माझ्या आईच्या तिच्या कामाप्रती असलेली श्रद्धा आणि जिद्दीला सलाम आणि माझ्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून नकळत ही ठरली आमच्यासाठी ‘येक नंबर मोमेंट’
आई तुला खूप प्रेम
You were missed Poornima Pandit-Pullan
आणि सगळ्यांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
हेही वाचा : Mid-Week एलिमिनेशन; ‘या’ दोन सदस्यांवर टांगती तलवार, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, कोण घेणार घराचा निरोप?
दरम्यान, तेजस्विनीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच ज्योती चांदेकर यांनी आजवर ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) या मालिकेद्वारे त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.