Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सुभेदारांच्या घरी प्रतिमाची एन्ट्री झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. प्रतिमाची घरात झाल्यापासून एकंदर सुभेदारांच्या घरातील प्रत्येक सदस्य आनंदी आहे. पूर्णा आजी तर लेकीकडे लक्ष देण्याची एकही संधी सोडत नाहीये. प्रतिमा पुन्हा आलीये पण, तिला भूतकाळातील एकही घटना आठवत नाहीये. प्रतिमा कोणाशी बोलतही नाही, ती केवळ सायलीशी संवाद साधते. असं मालिकेत पाहायला मिळत आहे. परंतु, आता पूर्णा आजी, सायली अन् कल्पना मिळून प्रतिमाची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

सायली प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी एक छान योजना आखते. प्रतिमा आत्या खूप सुंदर स्वयंपाक करतात. त्यामुळे स्वयंपाक घरात विविध पदार्थ केल्यावर त्यांना नक्की सगळं आठवेल असा विश्वास सायलीला असतो. परंतु, खोटी तन्वी अशी ओळख बनवून वावरत असल्याने प्रतिमाची स्मृती पुन्हा येणं हे प्रियासाठी धोक्याचं असतं. सायलीच्या प्लॅनला ती विरोध करते. मात्र, पूर्णा आजी यावेळी सायलीची पाठराखण करून प्रियाची बोलती बंद करते. ठरलेल्या योजनेनुसार आता प्रतिमा सुभेदारांच्या घरात सायलीला चिंच-गुळाची आमटी करायला शिकवणार आहे. लेकीला स्वयंपाक घरात हौसेने काम करताना पाहून पूर्णा आजीला प्रचंड आनंद होतो. अशातच आता मालिकेत ( Tharala Tar Mag ) आणखी एक ट्विस्ट येणार आहे.

shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
Tharla Tar Mag New Year Promo
ठरलं तर मग : सासरेबुवांचं मन जिंकण्याचा अर्जुनचा निर्धार! मधुभाऊंना शब्द देत म्हणाला, “तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची…”
Ajit pawar and Sharad Pawar
Ashatai Pawar : “शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून विठूरायाला साकडं, वर्षभरात…”, आशाताई पवार काय म्हणाल्या?
In the viral video the little girl has danced so amazingly she reminds Amruta Khanvilkar Dance in Vaje ki bara song
“वाजले की बारा…” गाण्यावर चिमुकलीने सादर केली भन्नाट लावणी, थेट अमृत्ता खानविलकरला देतेय टक्कर, Viral Video एकदा बघाच….

हेही वाचा : “वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य?”, निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे मोठा वाद; माफी मागूनही नेटकरी संतापले…

‘ठरलं तर मग’ मालिकेत रक्षाबंधन विशेष भाग

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत लवकरच रक्षाबंधन विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी घरातले सगळेजण रक्षाबंधन साजरे करतात. परंतु, प्रताप म्हणजेच अर्जुनच्या वडिलांना राखी बांधणारं कोणीच नसतं. यावर सायली म्हणते, “प्रतिमा आत्या आहेत ना…त्या सगळं विसरल्या आहेत पण, आपल्याला सगळ्या गोष्टी आठवत आहेत ना?” यानंतर प्रतिमा प्रतापचं औक्षण करून राखी बांधते. एवढ्या वर्षांनी आपली बहीण राखी बांधतेय हे पाहून प्रताप भावुक होतात. तर, रक्षाबंधन निमित्ताने सायलीने प्रतिमाची विशेष तयारी केली असते. सध्या अनेक वर्षांनी घरी आलेली प्रतिमा साधा ड्रेस, डोक्यावर ओढणी घेऊन वावरत आहे. परंतु, सणादिवशी सायली प्रतिमाला साडी, दागदागिने घालायला सांगते. प्रतिमाला तिच्या जुन्या रुपात पाहून सगळेच आनंदी होतात.

हेही वाचा : Video : “दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा…”, अंकिता घन:श्यामवर प्रचंड भडकली! ‘बिग बॉस’च्या घरातील नवा प्रोमो चर्चेत

दुसरीकडे, पूर्णा आजी सायलीला म्हणते, “या घरातल्या नात्यांचं खऱ्या अर्थाने तू रक्षण केलं आहेस.” असं सांगत आजी सायलीचा हात हातात घेते अन् तिला राखी बांधते. पूर्णा आजीचं हे प्रेम पाहून सायली भारावून जाते. ती लगेच आजीला मिठी मारून रडते असं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Tharala Tar Mag
Tharala Tar Mag – प्रताप सुभेदार ( फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )

हेही वाचा : “आजोबा, प्रत्येक क्षणाला तुमची…”, विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश-जिनिलीया भावुक, शेअर केले जुने फोटो

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेचा हा विशेष भाग येत्या २३ ऑगस्टला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता घरात स्वयंपाक केल्यावर, सण साजरे झाल्यावर प्रतिमाची गेलेली स्मृती पुन्हा येणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दररोज रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते.

Story img Loader