Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीला जिन्यावरून घसरल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच प्रतिमाची एन्ट्री झाली आहे. प्रतिमा व सायलीचं एक अनोखं नातं प्रेक्षकांना या निमित्ताने पाहायला मिळालं. प्रतिमा घरी आल्यापासून प्रिया सुभेदारांकडे मुक्कामी आलेली आहे. त्यामुळे प्रिया अर्जुनशी जवळीक साधण्याचा सतत प्रयत्न करताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली प्रियाला अर्जुनच्या खोलीत जाण्यापासून अडवते. परंतु, प्रिया तिचा हाताने ढकलते. परिणामी, सायलीचा जिन्यांवरून तोल जाऊन ती घसरत खाली पडते. यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागतो आणि सायली जागीच बेशुद्ध होते. बायको बेशुद्ध झाल्याचं अर्जुन पाहतो. तो ताबडतोब खाली येतो आणि तिला रुग्णालयात दाखल करतो. अर्जुनबरोबर कल्पना, अश्विन, प्रताप सगळेच रुग्णालयाच्या दिशेने जातात. दुसरीकडे, नागराज व महिमत मिळून प्रतिमाला जीवे मारण्याचा प्लॅन बनवत असतात.

हेही वाचा :स्टार प्रवाह’वर नव्या मालिकांची नांदी! निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत, जोडीला असतील ‘हे’ अभिनेते, पहिला प्रोमो प्रदर्शित

सायलीला झालेल्या अपघाताबाबत सुभेदार कुटुंबीय प्रतिमाला कोणतीही माहिती सांगत नाहीत. शेवटी सायलीला शोधण्यासाठी ती घराबाहेर पडते. अर्जुन सुद्धा प्रतिमाच्या मागोमाग तिला ( प्रतिमाला ) शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. शेवटी तो दहीहंडीवर चढून प्रतिमा आत्याला शोधणं हा एकच पर्याय बाकी असल्याचं चैतन्यला सांगतो. अर्जुन दहीहंडी फोडत असताना खाली नागराज-महिपतचे गुंड प्रतिमावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतात. एवढ्यात अर्जुन तिला वाचवण्यासाठी पुढे धावतो. अर्जुन वेळेत पोहोचल्यामुळे गुंडांच्या तावडीतून प्रतिमाची सुखरुप सुटका होते.

प्रतिमा व अर्जुन दोघंही नंतर सायलीला पाहण्यासाठी रुग्णालयात जातात. सायलीची अवस्था अत्यंत नाजूक असल्याची माहिती अर्जुनला अश्विन देतो. यामुळे सगळेच काळजीत पडतात. परंतु, आता पुढच्या भागात प्रतिमा सायलीला भेटण्यासाठी वॉर्डमध्ये जाणार आहे.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणार नवी पौराणिक मालिका! देवदत्त नागे साकारणार भगवान शिवशंकर, तर अभिनेत्री आहे…; पाहा जबरदस्त प्रोमो

सायली प्रतिमाला मारणार आई अशी हाक

प्रतिमाला सायलीच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवते. परंतु, काही केल्या सायलीला शुद्ध येत नाही. ती बेशुद्ध अवस्थेत असते. प्रतिमाचे डोळे तिला पाहून पाणावतात. ती वळून वॉर्डच्या बाहेर येत असते आणि इतक्यात तिला “आईSSS…” अशी हाक ऐकू येते. सायली पहिल्यांदाच प्रतिमाला “आईSSS…” अशी हाक मालिकेत मारणार आहे. तिच्या तोंडून आई हाक ऐकताच प्रतिमा भावुक होते. खरंतर, सायली हीच खरी तन्वी असते. याशिवाय ती प्रतिमा व रविराज किल्लेदार यांची मुलगी असते. आईच्या जवळ येण्याने लेक शुद्धीवर आल्याचा हृदयस्पर्शी प्रोमो ( Tharala Tar Mag ) पाहून नेटकरी सुद्धा भावुक झाले आहेत.

Tharala Tar Mag ( फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )

दरम्यान, आता येत्या काळात मालिकेत ( Tharala Tar Mag ) काय घडणार? सायली शुद्धीवर आल्यावर प्रतिमाची स्मृती परत येईल का या गोष्टी पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag sayali calls pratima aai watch emotional promo of the serial sva 00