‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या चैतन्य व साक्षीचं प्रेमप्रकरण अर्जुनसमोर उघड झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. अर्जुन-सायली हनिमूनला गेल्यावर साक्षी शिखरे वात्सल्य आश्रमासंदर्भातील पुरावे गोळा करण्यासाठी खोटं बोलून चैतन्यच्या घरी येते. दुसरीकडे, अर्जुन सायलीवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाल्याने ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी चैतन्यच्या घरी जातो. चैतन्यकडे साक्षीला पाहून अर्जुनला एकदम धक्का बसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साक्षी शिखरेला ताबडतोब घराबाहेर काढ असं अर्जुन चैतन्यला सांगतो. परंतु, चैतन्य आपल्या जवळच्या मित्राशी वाद घालून ‘मी आणि साक्षी लवकरच लग्न करणार’ असल्याचं त्याला ठणकावून सांगतो. चैतन्यने केलेला विश्वासघात पाहून अर्जुनला अश्रू अनावर होतात. तो घडलेला सगळा प्रकार सायलीला सांगतो.

हेही वाचा : “माझ्याशी लग्न करशील का?” जेव्हा भर साखरपुड्यात पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्याला करते प्रपोज…; पाहा खास व्हिडीओ

दुसऱ्या दिवशी, चैतन्य ऑफिसमध्ये जाऊन आपला राजीनामा अर्जुनला देतो. तसेच यापुढे आपण एकत्र काम करायचं नाही असं सांगतो. चैतन्य अर्जुनचा जवळचा मित्र आणि खूप चांगला सहकारी असल्याने त्याने अचानक नोकरी सोडल्याने अनेक गोष्टी बदलतात. अर्जुनला अनेक कागदपत्र वेळच्या वेळी सापडत नाहीत. एकंदर त्याचा गोंधळ उडतो आणि तो संतापतो. अर्जुनची होणारी घालमेल पाहून सायली नवऱ्याला मदत करायचं ठरवते.

हेही वाचा : शिवजयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखची मोठी घोषणा! २०२५ मध्ये मोठ्या पडद्यावर येणार ‘राजा शिवाजी’, पोस्टर आलं समोर

आता लवकरच अर्जुनला चैतन्यच्या जागी प्रत्येक कामात मिसेस सुभेदार अर्थात सायली मदत करणार आहे. परंतु, सायलीचं काम करणं अस्मिताला आवडत नाही. ती याविरुद्ध पूर्णा आजीचे कान भरते. घरी मुद्दाम पसारा करून ठेवते. “आजी बघ सायली घर न आवरताच कामावर निघून गेली” असं ती पूर्णा आजीला सांगते. यावर पूर्णा आजी सायलीवर भडकते “उद्यापासून तिने माझ्या परवानगीशिवाय घराबाहेर जायचं नाही” असा तिला निरोप कल्पनाकडे देते.

एकीकडे पूर्णा आजी चिडलेली असताना दुसरीकडे अर्जुन-सायली एकत्र काम करण्याचा निर्णय घेतात. आता आजीला हे समल्यावर पुढे काय घडणार? सायलीला अर्जुनबरोर काम करता येईल का? याचा येत्या काही भागांमध्ये उलगडा करण्यात येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag sayali decide to help arjun subhedar in office work purna aaji does not like the decision sva 00