Tharala Tar Mag Marathi Serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून जिन्यावरून घसरल्यामुळे सायलीचा अपघात झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सायलीची प्रकृती गंभीर असल्याने अर्जुन प्रचंड अस्वस्थ असतो. तर, दुसरीकडे प्रतिमावर महिपतचे गुंड हल्ला करणार असतात. या सगळ्यातून अर्जुन प्रतिमा आत्याची सुखरुप सुटका करतो. यानंतर दोघंही हॉस्पिटलची वाट धरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिमा रुग्णालयात जाऊन सायलीची भेट घेते. लेकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवल्यावर सायली तिला ‘आईsss’ अशी हाक मारते. सायलीला शुद्ध आल्यावर सगळे मनापासून आनंदी होतात. अर्जुन बायकोची मनापासून सेवा करत असतो. आता आजच्या भागात सायली सुभेदारांच्या घरी परत आल्याचं पाहायला मिळेल. ठणठणीत बरी होऊन सायली सुभेदारांच्या घरी परत येणार आहे. घरी पूर्णा आजी मोठ्या प्रेमाने लाडक्या सुनेचं स्वागत करते, तिची नजर काढते.

हेही वाचा : १४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री, पतीनेही केलंय दुसरं लग्न

सायली बरी होऊन घरी आल्याने सगळेजण आनंद व्यक्त करत असतात. एवढ्यात कुसूम प्रतिमाला “तुम्ही काल काय म्हणत होता?” असा प्रश्न विचारते. यावर प्रतिमा हातवारे करून गेल्यावर्षीच मी सायलीला भेटले आहे. तिला रुग्णालयात रक्त दिल्याचं सर्वांना सांगते. हा खुलासा ऐकून सगळेच थक्क होतात. अश्विन पुन्हा एकदा सर्वांसमोर “वहिनी आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप सारखा कसा काय?” असा प्रश्न उपस्थित करतो. यामुळे प्रियाच्या मनात भीती निर्माण होते.

प्रियाला दुसरीकडे, “सायली घरातल्यांसमोर आपण तिला जिन्यावरून ढकलल्याचं सांगेल का?” याबद्दल देखील भीती वाटत असते. अर्जुनकडे प्रिया, “सायली तुला ती कशी पडली वगैरे काही बोलली का याबद्दल चौकशी करते” परंतु, अर्जुन ‘नाही’ असं उत्तर देत विषय टाळतो. सायली अशीच सगळं सहन करेल असा विचार करून प्रिया निर्धास्त असते. परंतु, येत्या भागात सायली प्रियाला घडलेल्या घटनेबद्दल जाब विचार आहे.

हेही वाचा : “माझा बाप बनू नका…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांवर पुन्हा आवाज चढवला; नेटकरी म्हणाले, “हिला आवरा बिग बॉस…”

Tharala Tar Mag

सायली प्रियाला सुनावणार ( Tharala Tar Mag )

सायली तिला सक्त ताकीद देत सांगते, “तू स्वार्थी होतीस पण, तू एखाद्याच्या जीवावर उठू शकतेस हे आता मला कळून चुकलंय. मी भाबडी असेन पण, तुला वाटतेय तशी बावळट मी नक्कीच नाहीये. तुला प्रेमाची, मायेची भाषा कळत नाही. आता मी तुझ्याशी त्याच भाषेत बोलणार… जी तुला कळते.” असं सांगत सायली तिला थेट जिन्यावरून ढकलण्याचा प्रसंग जसाच्या तसा रिक्रिएट करून दाखवते. सायली आपल्याला ढकलून देईल याची स्पष्ट भीती प्रियाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

दरम्यान, आता अर्जुन-सायलीचं नातं कोणतं नवीन वळण घेणार? प्रतिमाची स्मृती परत येणार की नाही? ( Tharala Tar Mag ) याबाबत प्रेक्षकांच्या मनात आतुरता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag sayali recovers from injury and returns home also warns priya watch promo sva 00