Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली-अर्जुनमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. मधुभाऊंच्या केसमध्ये आपला नवरा जाणूनबुजून दिरंगाई करतोय असा समज सायली करून घेते. तर, दुसरीकडे अर्जुन-सायलीच्या भांडणाचा फायदा प्रिया उचलते. एका नामांकित वकिलाला पैसे देऊन प्रिया अर्जुन-सायलीच्या घटस्फोटाची कागदपत्रं बनवून घेते. यावर प्रिया सायलीच्या नावाने तिच्या खोट्या सह्या देखील करते. ही कागदपत्रं अर्जुनच्या हातात पडल्यावर त्याला मोठा धक्का बसतो.

अर्जुन-सायलीचा घटस्फोट होणार हे ऐकताच पूर्णा आजीच्या पायाखालची जमीन सरकते. कल्पना, प्रताप, अश्विन सगळे सायलीची समजून काढतात. पण, हे सगळं नेमकं काय सुरु आहे याचा अंदाज सायलीला अजिबात येत नसतो. एवढ्यात अर्जुन चैतन्यसमोर आपलं मन मोकळं करतो आणि ‘मी मिसेस सायली यांना याबद्दल जाब विचारणार’ असं सांगतो. तो रागा-रागात सायलीला घेऊन येतो आणि तुम्ही असं का वागलात याचा जाब विचारतो.

tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

सायली यानंतर चिडलेल्या अर्जुनला चांगलाच आरसा दाखवते. “आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, त्यामुळे ज्यादिवशी आपलं कॉन्ट्रॅक्ट झालं, त्याच दिवशी आपण घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केल्यात, मी वेगळे पेपर्स का पाठवू?” असं ती अर्जुनला विचारते. बायकोचं म्हणणं ऐकल्यावर अर्जुन देखील विचारात पडतो आणि हे वेगळंच कारस्थान असल्याचं त्याच्या लक्षात येतं. पुढे, अर्जुन-सायली या प्रकरणाचा ( Tharala Tar Mag ) शोध घेण्याचं ठरवतात.

हेही वाचा : जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”

प्रियाचं कारस्थान होणार उघड

‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेत सुभेदार कुटुंबीय या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी एकत्र जमतात. यावेळी अर्जुन सर्वांना सांगतो, “सायली तुझी सही वेगळीये आणि या कागदपत्रांवरची सही वेगळीये…मी आता वकिलांना फोन करतो.” यावेळी प्रियाच्या चेहऱ्यावर बारा वाजतात.

अर्जुन प्रियाला (खोटी तन्वी ) म्हणतो, “आमचे हे घटस्फोटाचे पेपर्स तू बनवलेस तन्वी…” यावर ती म्हणते, “हे खोटंय” अर्जुन पुढे म्हणतो, “पुराव्यांशिवाय हा अर्जुन सुभेदार कधीच काही बोलत नाही.” तो वकिलांना थेट फोन करतो. समोरून वकिल सांगतात, “तन्वी किल्लेदार ( प्रिया ) माझ्याकडे आल्या आणि सायली सुभेदारांच्या नावाने घटस्फोटाची नोटिस बनवून द्यायला त्यांनी मला भाग पाडलं” हे ऐकल्यावर सायली कसलाही विचार न करता प्रियाला सणसणीत कानाखाली मारते.

सायली प्रियाला सक्त ताकीद देत म्हणते, “तू कितीही प्रयत्न कर प्रिया…आमचं लग्न असंच मोडणार नाही. साता जन्माची गाठ बांधलीये आम्ही आणि तुझ्या अशा प्रयत्नांनी ती गाठ कधीच तुटणार नाही.” हे ऐकल्यावर अर्जुनला सुद्धा आनंद होतो.

हेही वाचा : Singham Again ने वीकेंडला कमावले तब्बल…; कमाई पाहून चित्रपटाचा मराठमोळा लेखक भारावला, क्षितिज म्हणाला…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ( Tharala Tar Mag ) मालिकेचा हा महाएपिसोड ७ नोव्हेंबर रात्री ८.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. आता यावर रविराज किल्लेदार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader