Tharala Tar Mag Marathi Serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सायली अलिबागला जाऊन प्रतिमाची शोधाशोध करते अन् देवी आईसमोर साकडं घालून तिला घरी परत घेऊन येते. प्रतिमाची सुभेदारांच्या घरात एन्ट्री झाल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. एवढे वर्षे घरापासून दूर असलेली प्रतिमा अचानक आल्याचं पाहून पूर्णा आजीला अश्रू अनावर होतात. परंतु, मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. तो म्हणजे प्रतिमा घरात आल्यावरही कोणालाच ओळखू शकत नाही. तिची वाचा गेलेली असते, ती कोणालाही ओळखत नसते. त्यामुळे सगळेच तिची काळजी करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिमाला घरी आल्याचं पाहून सर्वांनाच आनंद होतो. पण, प्रत्यक्षात प्रतिमाला केवळ सायलीचाच आधार वाटत असतो. सायलीच प्रतिमा व रविराज किल्लेदारांची खरी मुलगी तन्वी असते. प्रतिमा पुन्हा घरी आल्याची कल्पना सुभेदार कुटुंबीय रविराज किल्लेदारांना देतात. यानंतर रविराज-प्रियासह संपूर्ण किल्लेदार कुटुंबीय सुभेदारांच्या घरी पोहोचतात. प्रतिमाला पाहून प्रिया अन् नागराजला धक्का बसतो. प्रिया आम्ही आईला आमच्या घरी घेऊन जातो असं पूर्णा आजीला सांगते. पण, अचानक एवढ्या सगळ्या माणसांना पाहून प्रतिमा बिथरून जाते. ती सायलीच्या जवळ उभी राहते.

हेही वाचा : Video : Bigg Boss वहिनीचं तरी ऐका! घरात वाहू लागले प्रेमाचे वारे; निक्की तांबोळी अन् अरबाजची जोडी जमणार का?

सायली खोलीत नेऊन प्रतिमाची समजूत काढते. सुभेदारांच्या घरात तुम्हाला फक्त प्रेम मिळेल याची शाश्वती ती प्रतिमाला देते. दुसरीकडे, “सायली माझ्या आईचा विचार करत नाहीये” असा आरोप प्रिया करते. पण, प्रियाचे आरोप ऐकून पूर्णा आजी तिला चांगलंच झापते. “परिस्थितीचं गांभीर्य सायलीला उत्तम कळतं त्यामुळे प्रतिमा आता पुढचे काही दिवस सुभेदारांकडेच राहील” असा निर्णय पूर्णा आजी घेते. प्रतिमाला सायलीची सवय असल्याने रविराज सुद्धा यासाठी तयार होतात. “मी प्रतिमा आत्यांची पूर्ण काळजी घेईन” असा विश्वास सायली किल्लेदारांना देते.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार? ( tharala tar mag )

आता पुढच्या भागात सायली प्रतिमाला आपल्या जवळ घेऊन तिच्यासाठी खास अंगाई गाणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. खरंतर सायली अन् प्रतिमा खऱ्या मायलेकी असतात पण, महिपत-नागराजने घडवून आणलेल्या भीषण अपघातामुळे दोघींची स्मृती गेलेली असते. सध्या सायली अर्जुनची आत्या म्हणून प्रतिमाची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “डिअर कोकण हार्टेड बॉय…”, Bigg Boss फेम अंकिता वालावलकरने दिली प्रेमाची जाहीर कबुली, लग्न केव्हा करणार?

ठरलं तर मग ( tharala tar mag )

दरम्यान, सायली प्रतिमाची एवढी सेवा करतेय हे पाहून पूर्णा आजीचे डोळे पाणावल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तर, अर्जुन बायकोच्या मनाचा मोठेपणा पाहून तिच्या नव्याने प्रेमात पडतो. प्रतिमा आत्या अन् सायलीकडे पाहून अर्जुन भारावून जातो. याशिवाय संपूर्ण सुभेदार कुटुंबीय खोलीच्या दारात उभं राहून या दोघींकडे प्रेमाने पाहत असल्याचं मालिकेच्या ( tharala tar mag ) नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag sayali taking care of pratima watch new promo of marathi serial sva 00