‘ठरलं तर मग’ या छोट्या पडद्यावरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सध्या मालिकेत सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. सायलीवर महिपतने पाठवलेले गुंड गणपती विसर्जन मिरवणुकीत हल्ला करतात. यानंतर अर्जुन अस्वस्थ होऊन बायकोला रुग्णालयात दाखल करतो. रुग्णालयात प्रतिमाने ( सायलीची आई) केलेल्या मदतीमुळे सायली थोडक्यात बचावते आणि सोमवारच्या भागात सायली शुद्धीवर आल्याचं दाखवण्यात आलं आहे. आता मालिका पुढे काय रंजक वळण घेणार? जाणून घेऊयात…

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने ‘या’ लोकप्रिय मालिकेत घेणार एन्ट्री, पहिला लूक आला समोर

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tharla tar mag arjun will married to sayali reveals chaitanya
अर्जुनचं लग्न सायलीशीच होणार! ‘ठरलं तर मग’ अभिनेत्याने सांगितला मालिकेतील पुढचा ट्विस्ट, काय आहे योजना?
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
What is the meaning of chiranjiv and saubhagyakankshini
लग्नपत्रिकेत वराच्या नावापुढे ‘चिरंजीव’ आणि वधूच्या नावापुढे ‘सौभाग्यकांक्षिणी’ का लावले जाते?
Patrachawl, Patrachawl yojana, mhada , mumbai,
मुंबई : सतरा वर्षांची प्रतीक्षा संपणार, पत्राचाळीतील मूळ भाडेकरूही लवकरच हक्काच्या घरात

‘ठरलं तर मग’ मालिकेचा विशेष भाग येत्या १५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या काही भागांमध्ये सायली पूर्णपणे बरी होऊन सुभेदारांच्या घरी परतल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. घरी आल्यावर अर्जुन सुभेदारच्या वागण्यात बदल झाल्याचं सायलीला जाणवतं. सायलीची मैत्रीण कुसुमला अर्जुन, ‘मी तिची सगळी काळजी घेईन’ असं सांगतो. नायकाच्या वागण्या-बोलण्यात बदल झाल्याने सायली-अर्जुनचं नातं मालिकेत हळुहळू बहरतं असल्याचं पाहायला मिळत आहे. अर्जुनला सायलीबद्दल प्रेम निर्माण झाल्यावर त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाच्या बॉण्डचं भविष्यात काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : “मी शूटिंग करत होते अन् अचानक…”, पतीच्या ब्रेन स्ट्रोकबाबत श्वेता मेहेंदळेचा खुलासा; म्हणाली, “तो परत अभिनय…”

१५ ऑक्टोबरच्या महाएपिसोडमध्ये मालिकेत एक नवीन वळण येणार आहे. कॉन्ट्रॅक्ट लग्नाच्या बॉण्डमुळे अर्जुन-सायली यांनी मंदिरात लग्न केलेलं असतं. त्यांच्या लग्नाला सुभेदार कुटुंबीयांपैकी कोणीही उपस्थित नसतं. त्यामुळे येत्या विशेष भागात पूर्णा आजी अर्जुनला ‘तुझं लग्न मला पाहता आलं नाही’ असा टोमणा मारते. पूर्णा आजीमुळे अर्जुन ताबडतोब सायलीचा हात धरून सुभेदार कुटुंबीयांसमोर सप्तपदी घेतो, तिला मंगळसूत्र घालतो आणि दोघेही पुन्हा एकदा लग्न करतात. अर्जुनच्या पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयामुळे प्रिया, अस्मिता आणि घरातील इतर मंडळी आश्चर्यचकीत होतात. असं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने पुण्यात सुरू केलं नवीन हॉटेल, नावही ठेवलंय खास, पाहा पहिली झलक

jui
जुई गडकरी

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका साधारण वर्षभरापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेचं रंजक कथानक, अर्जुन-सायलीची जोडी, दिग्गज कलाकारांमुळे मालिका पहिल्या दिवसापासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत नव्याने काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.

Story img Loader