‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अश्विनला त्याची गर्लफ्रेंड सोडून गेल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. अश्विन हा अर्जुनचा लहान भाऊ असल्याने त्याला या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची संपूर्ण जबाबदारी सायली स्वत: घेते. दुसरीकडे भावाची अवस्था पाहून अर्जुन सुद्धा व्यथित झालेला असतो. त्यामुळे येत्या भागात सायली अर्जुनला महत्त्वाचा सल्ला देणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अश्विनची अवस्था पाहून अर्जुन सर्वांना ‘सगळ्या मुली अशाच असतात, फसवणूक करुन निघून जातात’ असा दोष देऊ लागतो. नवऱ्याच्या तोंडची वाक्य ऐकून, सायली अर्जुनला जोडीदाराचं महत्त्व काय असतं हे पटवून द्यायचं असा निर्धार करते. येत्या भागात अश्विन प्रकरणामुळे अर्जुन-सायलीच्या नात्यात नवीन वळण येणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Tula Shikvin Changalach Dhada promo
भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी! सासूला खडेबोल सुनावून अक्षरा घर सोडून जाणार…; मास्तरीण बाईंना अधिपती म्हणाला…

हेही वाचा : “बायको Happy Anniversary”, शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण! पत्नीला म्हणाला, “चिडक्या, भावुक…”

सायली-अर्जुनची समजूत काढून सगळ्या मुली सारख्या नसतात असं त्याला सांगणार आहे याशिवाय त्याला जोडीदाराचं महत्त्व पटवून देणार आहे. सायली अर्जुनला सांगते, “आपल्या आयुष्यात जोडीदार फार महत्त्वाचा असतो सर, सगळ्या मुली सारख्या नसतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं की, एखादी छानशी मुलगी पाहून लग्न करा.”

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अनघाला मालिकेतील ‘या’ कलाकाराने दिलं हटके गिफ्ट! अभिनेत्री म्हणाली, “आणखी एक…”

सायलीचं बोलणं ऐकून अर्जुनला काहीच सुचत नसतं. कारण, सायलीप्रमाणे इतर कोणतीच मुलगी आपल्याला समजून घेणार नाही याबद्दल त्याच्या मनात खात्री असते. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. एकंदर अश्विन प्रकरणामुळे अर्जुनला सायलीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल का? ठरलं तर मग मालिकेत आगामी भागात आणखी काय ट्विस्ट येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader