‘ठरलं तर मग’ ही मालिका या आठवड्यात ‘महाराष्ट्राची नंबर १’ मालिका ठरली आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मध्यंतरी सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स मालिकेत सुरू होता. या हल्ल्यातून सायली थोडक्यात बचावून सुखरूपपणे सुभेदारांच्या घरी परतली आहे. सायली घरी परतल्यावर काय होणार? प्रिया आणि अस्मिताचा नवा डाव काय असेल हे प्रेक्षकांना १ तासाच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. मालिकेचा १ तासाचा विशेष भाग १५ ऑक्टोबरला प्रसारित करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : “चुकीची कामं केल्यावर…”, पती राज कुंद्राबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल, नेटकरी म्हणाले…

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या विशेष भागात अर्जुन-सायलीचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्जुन पूर्णा आजीचा त्रास आणि तिच्या टोमण्यांमुळे अचानक सायलीबरोबर लग्न करणार असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. परंतु, अस्मिताने भडकवल्यामुळे पूर्णा आजी सायलीला त्रास देण्यास सुरूवात करते. हे मालिकेचा विशेष भाग पाहिल्यावर लक्षात येतं. अस्मिता-प्रिया सायलीला पूर्णा आजीसमोर कमी लेखण्यासाठी पुन्हा एकदा नवीन डाव रचतात. यानुसार अस्मिता पूर्णा आजीला तिच्या खोलीत जाऊन सायलीविरुद्ध भडकवते आणि त्यानंतर तू सायलीवर लक्ष ठेव असं सांगते.

हेही वाचा : Ali Fazal Birthday: इच्छा होती वैमानिक आणि डॉक्टर होण्याची, झाला विचारी अभिनेता; गुड्डू पंडित फेम अली फजलची भरारी

सायली घरात आल्यामुळे सगळी संकटं येऊ लागली, यापूर्वी असं कधीच झालं नसल्याचं अस्मिता सुभेदार पूर्णा आजीला सांगते. सायलीचा आधीपासून तिरस्कार करत असल्याने पूर्णा आजी लगेच अस्मिताच्या गोष्टी मान्य करते. दुसरीकडे, रविराज किल्लेदारची मनधरणी करून प्रिया सुभेदारांकडे यायला निघते. सुभेदारांच्या घरी आल्यावर प्रिया चांगलं वागण्याचं नाटक करू लागते आणि स्वत:ची तुलना प्रतिमाशी करते. तिच्या बोलण्याने पूर्णा आजी पुरती मोहून जाते. पुढे, पूर्णा आजी सर्वांसमोर सायली-अर्जुनच्या मंदिरात झालेल्या लग्नाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

हेही वाचा : KKK 13 Winner : आधी शो नाकारला, आता विजेता ठरला; कोण आहे डिनो जेम्स? ट्रॉफीसह जिंकले तब्बल ‘एवढे’ लाख

पूर्णा आजीचे टोमणे ऐकूनही अर्जुन शांत राहिल्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करतात. कोणालाही प्रत्युत्तर न देता अर्जुन सप्तपदीला लागणारं साहित्य गोळा करतो आणि सायलीबरोबर पुन्हा लग्न करतो. अर्जुनने घरात सर्वांसमक्ष पुन्हा लग्न केल्याने पूर्णा आजी चांगलीच भडकते आणि नातवाला खेळ मांडून ठेवला आहेस का? असा जाब विचारते यावर अर्जुन काय उत्तर देणार हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ठरलं मग मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायली, तर अमित भानुशालीने अर्जुन हे पात्र साकारलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag special episode of sayli arjun remarriage due to purna aaji know in details sva 00