‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीमध्ये हळुहळू प्रेम बहरत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. साक्षी-प्रियाने अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णा आजीसमोर सांगितल्याने सुभेदारांच्या घरात प्रचंड गोंधळ निर्माण होतो. सायली देवीसमोर शपथ घेऊन ‘आमचं लग्न खरंय’ असं पूर्णा आजीला सांगते. त्यामुळे प्रियाचा डाव पुन्हा एकदा फसतो आणि अर्जुन-सायली दोघंही सुटकेचा नि:श्वास सोडतात. पण, प्रत्यक्षात मात्र आता दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य केवळ चैतन्य आणि कुसूम या दोनच व्यक्तींना माहिती असतं. इतर कोणालाही त्यांच्यात झालेल्या कराराबद्दल कल्पना नसते. अशा परिस्थिती प्रियाला ही मोठी गोष्ट कशी काय समजली याचा विचार अर्जुन करत असतो. अखेर चैतन्य ‘साक्षीसमोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मी उघड केलंय’ याची कबुली देतो. यावर अर्जुनचा राग अनावर होतो. एकीकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे मालिकेत सायलीच्या कुसुम ताईचं पुनरागमन होणार आहे.
हेही वाचा : मराठमोळी ऋतुजा बागवे झळकणार हिंदी मालिकेत! ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याबरोबर साकारणार भूमिका, म्हणाली…
‘ठरलं तर मग’ मालिकेत आता पुन्हा एकदा कुसुमची एन्ट्री होणार आहे. आश्रमापासून कुसुम आणि सायलीची एकमेकींशी घट्ट मैत्री असते. लाडक्या मैत्रिणीला अनेक दिवसांनंतर पाहिल्यावर सायली आपलं मन मोकळं करणार आहे.
हेही वाचा : Video : ‘देख तुनी बायको कशी…’ रेश्मा शिंदेचा खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स; म्हणाली, “जेव्हा नणंद…”
‘ठरलं तर मग’ मालिकेचे चाहते ज्या क्षणाची प्रचंड आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. सायली कुसुमसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. “अर्जुन सरांच्या मी नकळत प्रेमात पडले…पण, त्यांच्या मनात असं काहीच नाहीये” असं कुसुमला सांगत सायली प्रचंड रडते. तर, दुसरीकडे सायलीचा फोटो मोबाईलमध्ये पाहून “माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे… तुम्हाला मला बायको म्हणून मिरवायचं होतं सायली पण, तुमच्या मनात या भावना नाहीत” असा विचार करून अर्जुनला देखील अश्रू अनावर होतात. आता या नव्या गैरसमजामुळे अर्जुन-सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ११ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आता सायली-अर्जुन एकमेकांसमोर प्रेमाची कबुली केव्हा देणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.