छोट्या पडद्यावरील मालिकांचा दर आठवड्यात काय टीआरपी असणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते. गेल्या दिवसांत छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका चालू झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच टेलिव्हिजन विश्वाच्या ‘देवयानी’ने म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या शिवानी सुर्वेने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेद्वारे पुनरागमन केलं. त्यामुळे टीआरपीच्या यादीत काय उलटफेर होणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलं होतं.

शिवानीने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतल्यावर पहिल्याच आठवड्यात पहिल्या स्थानावर विराजमान असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला चांगली टक्कर देत दुसरं स्थान पटकावलं होतं. इतर सगळ्या मालिका तिसऱ्या, चौथ्या स्थानी होत्या. त्यामुळे या आठवड्यात सुद्धा शिवानीच्या मालिकेचा टीआरपी काय असणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु, छोट्या पडद्यावर गेल्या दीड वर्षांपासून अधिराज्य गाजवलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने आपलं पहिलं स्थान नेहमीप्रमाणे कायम ठेवलं आहे. तर, गेल्या आठवड्याच दुसऱ्या स्थानवर असलेली शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही मालिका आता चौथ्या स्थानावर घसरली आहे. याशिवाय टीआरपीच्या यादीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे कला व मुक्ताच्या मालिकांना स्थान मिळालं आहे.

हेही वाचा : “आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो, मग गोठा, पत्र्याचं घर…”, अखेर रुपाली भोसलेचं स्वप्न झालं पूर्ण! दाखवली नव्या घराची झलक

‘या’ आठवड्यातील टॉप १५ मालिकांची यादी

१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी
३. प्रेमाची गोष्ट
४. थोडं तुझं आणि थोडं माझा
५. घरोघरी मातीच्या चुली
६. येड लागलं प्रेमाचं
७. साधी माणसं
८. साधी माणसं – महाएपिसोड
९. अबोली – महाएपिसोड
१०. अबोली
११. शुभविवाह
१२. मन धागा धागा जोडते नवा
१३. पारू
१४. सुख म्हणजे नक्की काय असतं
१५. मुरांबा

हेही वाचा : Mirzapur 3 : ‘त्रिपाठी, पंडित ते गुप्ता’, ‘या’ ६ कुटुंबांभोवती फिरतंय ‘मिर्झापूर’चं राजकारण! कालीन भैय्या की गुड्डू, कोण मारणार बाजी?

TRP च्या यादीत नेहमीप्रमाणे ‘स्टार प्रवाह’चं वर्चस्व कायम आहे. टॉप १० मध्ये सगळ्या याच वाहिनीच्या मालिका आहेत. परंतु, या सगळ्यात ‘झी मराठी’च्या नव्याने चालू झालेल्या मालिकांनी झेप घेतली आहे. या आठवड्यात ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन मालिका अनुक्रमे तेराव्या आणि सोळाव्या क्रमांकावर आहेत. तर, अक्षरा – अधिपतीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका’ १७ व्या स्थानावर आहेत.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका ही गेली दीड वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांनी प्रमुख भूमिका साकारली असून यांनी साकारलेल्या अर्जुन-सायलीच्या पात्रांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.