छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी प्रचंड चढाओढ सुरू असते. स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने नेहमीप्रमाणे मागील आठवड्यातही TRP च्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. लग्नाच्या ट्रॅकमुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ऑनलाइन टीआरपीत पुढे होती. परंतु, टेलिव्हिजन टीआरपीत ‘ठरलं तर मग’चं अग्रस्थानी आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’, तर अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारलं आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट लग्न, मालिकेत येणारी रंजक वळणं यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ही मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

हेही वाचा : जिनिलीयाचं मराठीत पदार्पण ते आईच्या हस्ते मुहूर्ताचा शॉट; रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला १ वर्ष पूर्ण! पाहा खास व्हिडीओ

‘ठरलं तर मग’ टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानी असून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी अनुक्रमे ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘आई कुठे काय करते, या मालिका आहेत.

यानंतर सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी अनुक्रमे ‘कुण्या राजाची तू गं राणी’, ‘सुभेदार’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘आता होऊ दे धिंगाणा’ सीझन २ यांना स्थान मिळालं आहे. याशिवाय टॉप १५ च्या यादीत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही ‘झी मराठी’ ची एकमेव मालिका १४ व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा : “करोना परत आलाय…”, ‘लावणी क्वीन’ मेघा घाडगेने शेअर केला रुग्णालयातील व्हिडीओ, चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

दरम्यान, ‘झी मराठी’वर काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाने टीआरपीच्या शर्यतीत एन्ट्री घेत २० वं स्थान मिळवलं आहे. सध्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.