‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेत सध्या नवरात्र उत्सवाचा सीक्वेन्स सुरू आहे. गुंडांच्या हल्ल्यातून सायली सुखरुप बचावल्यामुळे सुभेदारांच्या घरी सायलीच्या हस्ते घटस्थापनेची पूजा करण्यात येते. मालिकेत गेल्या काही भागांमध्ये अर्जुन सायलीवर नाराज असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आता आगामी भागात सुभेदारांच्या घरात नेमकं काय घडणार जाणून घेऊया. सध्या सोशल मीडियावर मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Birthday Special : यशराजमध्ये नोकरी, राणी मुखर्जीची असिस्टंट ते बॉलीवूड अभिनेत्री, ‘असा’ आहे परिणीती चोप्राचा प्रवास

दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मेरेज असल्याने सायली अर्जुनला रुग्णालयातील उपचारांचा खर्च परत करेन असं सांगते परंतु, अर्जुनला सायलीचा निर्णय पटलेला नसतो. शेवटी सायली कान धरुन माफी मागत अर्जुनची मनधरणी करते. अर्जुनच्या मनात हळुहळू सायलीबद्दल प्रेम निर्माण होत असल्याने त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मेरेज पुढे काय वळण घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : २० वा आशियाई चित्रपट महोत्सव: समकालीन प्रादेशिक आणि मराठी चित्रपट स्पर्धेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन

प्रेक्षकांना आगामी भागात सायली बाथरुममध्ये काम करत असताना तिच्या हातातून पाईप निसटतो आणि ती संपूर्णपणे भिजते यानंतर अर्जुन तिला मदत करतो असा सीक्वेन्स पाहायला मिळणार आहे. पाण्याचा नळ बंद होत नसल्याने सायली अर्जुनला मदतीसाठी आवाज देते, तिचा आवाज ऐकून अर्जुन धावत बाथरुममध्ये येतो. यानंतर सायली सर, तुम्ही इथेच थांबा मी बाहेर जाऊन आवरून घेते असं त्याला सांगते. इतक्यात सायली-अर्जुनच्या खोलीत अस्मिता येते.

हेही वाचा : ‘पदार्पणासाठीच पाच वर्षांची प्रतीक्षा’

सायली बाहेर आल्यावर अर्जुन तिला मिसेस सायली तुमचं आवरलं का? असा आवाज देतो. इथे सायलीला खोलीत आलेल्या अस्मिताला पाहून खूपच टेन्शन आलेलं असतं. अर्जुनचं असं बोलणं ऐकून अस्मिताच्या मनात सायली-अर्जुनच्या नात्याबद्दल प्रश्न निर्माण होतो. दोघेही नवरा-बायको असताना एकमेकांशी असे परक्यासारखे का वागत आहेत? असा विचार अस्मिता करू लागते. प्रियाच्या सांगण्यानुसार सायली-अर्जुन खरंच लग्नाचं नाटक करत असल्याचा संशय आता अस्मिताच्या मनात देखील निर्माण झाल्याचं आगामी प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अस्मिताला आलेला संशय अर्जुन-सायली कसा दूर करणार हे पुढच्या भागात स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag upcoming episode update asmita doubt on sayli arjun relationship sva 00